उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
Hatkanangle LokSabha constituency : निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांकडून वेगवेगळ्या खेळ्या सुरुच असतात. काही वेळेस मतविभाजन करुन विजय मिळवणे, हा पर्यायही नेत्यांना आजमावून पाहतात.
Hatkanangle LokSabha constituency : निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांकडून वेगवेगळ्या खेळ्या सुरुच असतात. काही वेळेस मतविभाजन करुन विजय मिळवणे, हा पर्यायही नेत्यांना आजमावून पाहतात. असाच प्रकार हातकणंगले लोकसभा (Hatkanangle LokSabha) मतदारसंघात करण्यात आलाय. हातकणंगले लोकसभा (Hatkanangle LokSabha) मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणाला वेग आलाय. ठाकरेंचे उमेदवार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या नावाशी साधर्म्य असणारे लोक शोधून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
डमी उमेदवाराचा राजू शेट्टींना बसला होता फटका
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना डमी उमेदवाराचा फटका बसला होता. बहुनज महापार्टीने राजू शेट्टी नाव असलेल्या उमेदवाराला निवडणुककीत उतरवले होते. त्यामुळे राजू शेट्टी यांना फटका बसला होता. डमी राजू शेट्टीने 8 हजार मतं खाल्ली होती.
हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. याशिवाय राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. तर वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे. प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत चौरंगी लढतीवर आली आहे.
प्रकाश आवाडेंची लोकसभा निवडणुकीतून माघार
आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेतून शड्डू ठोकलाय. मात्र, आवाडेंचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आलंय. मात्र, अगोदरच चौरंगी लढत असलेल्या हातकणंगलेमध्ये डमी उमेदवार डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांना डमी उमेदवारांचा फटका बसणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरेंकडून उमेदवार
राजू शेट्टी आमच्या चिन्हावर निवडणूक लढवावी किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन निवडणूक लढवावी, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली होती. मात्र, राजू शेट्टी यांनी ठाकरेंची ऑफर नाकारली. त्यानंतर ठाकरेंनी सत्यजित पाटील सरुडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शिवाय, निवडणुकीत त्यांना चांगला प्रतिसादही मिळताना दिसतोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Video: माझा लहान भाऊ म्हणत मोदींनी भर मंचावर शिट्टी दिली, महादेव जानकरांनी जोरजोराने वाजवली