Gunratan Sadavarte : 'ठाकरे-पवारांना गेटआऊट...', देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होताच गुणरत्न सदावर्तेंचा पहिला वार
Gunratan Sadavarte : देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी पार पडताच गुणरत्न सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Gunratan Sadavarte on Uddhav Thackeray and Sharad Pawar, मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी (दि.5) महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी आनंद व्यक्त केलाय. याशिवाय सदावर्तेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीये. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
एसटी कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना गेट आऊट केलं होतं
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आझाद मैदानाने तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. 124 आत्महत्येनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना गेट आऊट केलं होतं. लोकांच्या मनातून आणि विचारातून त्यांना गेट आऊट केलं होतं. त्यानंतर त्याच आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री जे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत, त्यांनी पहिला मेळावा घेतला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र होऊन फार मोठा जल्लोष केला होता, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगेंवरही जोरदार टीका
ए जरांग्या, फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारलंय. शिस्तीत राहा,असं म्हणत सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही जोरदार टीका केली.
संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीचे नेते होते. मी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं तुमचं म्हणणं काय? ज्यांनी तुम्हाला त्रास दिला. त्यावेळी फडणवीस मला म्हणाले मी त्यांना माफ केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जातीय दंगली हव्या असतात. हे महाराष्ट्रने पाहिलेलं सत्य आहे, अशी टाकाही सदावर्ते यांनी केली.
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मला म्हणाले नरेंद्र मोदी आणि ते स्वतः हे दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाच मानतात. देवेंद्र फडणीस हे कष्टकरांच्या मनातील नेते आहेत. देश म्हणजेच त्यांचं कुटुंब आहे. दुबईमध्ये आनंद व्यक्त केला जातोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या