Astrology : एक रुपया की कीमत तुम क्या जानो! प्रेझेंट पाकिटात नेहमी 1 रुपयाच का दिला जातो? केवळ परंपरा की त्यामागे कारण आहे?
Astrology : प्रेझेंट पाकिट 51 रुपयांचं असो वा 1001 यामध्ये नेहमी एक रुपयांचं नाणं देतात. याचं कारण म्हणजे, पाकिटात किती जरी पैसे असले तरी जेव्हा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो तेव्हाच ते पाकिट शुभ मानलं जातं.
Astrology : लग्न-समारंभ, मुंज किंवा एखाद्या शुभ कार्याच्या वेळी प्रेझेंट पॉकेट देण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. हे प्रेझेंट पॉकेट समोरच्या व्यक्तीला शुभेच्छा किंवा आशीर्वाद म्हणून देतात. या पाकिटात आपण 51, 251, 501 रुपयांबरोबरच नेहमी एक रुपयाचं नाणं देखील देतो. पण, तुम्ही कधी याचा विचार केला आहे का?
पाकिटात 11, 21, 51, 101, 251, 1001 असे पैसे आपण देतो. या सगळ्यात आपण एक रुपया का टाकतो याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रेझेंट पाकिटात 1 रुपयाचं नाणं का असतं?
प्रेझेंट पाकिट 51 रुपयांचं असो वा 1001 यामध्ये नेहमी एक रुपयांचं नाणं दिलं जातं. याचं कारण म्हणजे, पाकिटात किती जरी पैसे असले तरी जेव्हा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो तेव्हाच ते पाकिट शुभ शगुन मानलं जातं. तसेच, 1 या संख्येला अविभाज्य मानलं जाते. याचं विभाजन केलं जात नाही. यासाठीच पाकिटात एक रुपयाचं नाणं दिलं जातं. तसेच, नातं दिर्घकाळ टिकावं, नात्यातील बंध टिकून राहावा यासाठी देखील हे नाणं दिलं जातं.
काय आहे धार्मिक मान्यता?
धार्मिक मान्यतेनुसार, एक रुपयाचं नाणं फार खास मानलं जातं. असं म्हणतात की, याचा संबंध थेट देवी लक्ष्मीशी आहे. कोणाला जर एक रुपयाचं नाणं दिलं तर त्यामागे देवीचा आशीर्वाद असतो अशी मान्यता आहे. जेव्हा पाकिटात एक रुपयाचं नाणं देतात तेव्हा याचा संबंध सुख-समृद्धीशी जोडण्यात येतो.
तसेच, मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला धातूशी देखील जोडण्यात आलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण हे पाकिट देतो तेव्हा त्याबरोबर देवीचा आशीर्वादही प्राप्त होतो यासाठी पाकिटात नेहमी एक रुपयाचं नाणं देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :