बंगल्यावरून काय भांडणं ..गुलाबराव पाटील पालकमंत्रीपदासह नाराज आमदारांवर म्हणाले..
पाच वर्षांनंतर पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्रीपदासह अनेक मुद्द्यांवर बोललेत.
Gulabrao Patil: राज्यात विधानसभेच्या निकालानंतर तब्बल दीड महिना उलटून गेला असला तरी अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर कोण असणार याची नावं जाहीर झाली नाहीत. दरम्यान, राजकीय हलचालींना वेग आला असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री पदं जाहीर करतील अशी चर्चा आहे. दरम्यान पाच वर्षांनंतर पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्रीपदासह अनेक मुद्द्यांवर बोललेत. प्रत्येकाला वाटतं आपल्याला बागायती शेती मिळावी कोरडवाहू मिळू नये असं पालकमंत्रीपदावरून सुरु असलेल्या राजकीय नाराजीवर बोलले. योगायोगानं मला पाच वर्षानं पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळालं असल्याचं सांगत खातं स्विकारण्यास विलंब झाला असला तरी मला माझा खात्याची माहिती आहे मी नाराज नसल्याचं ते म्हणालेत. बंगल्यावरून काय भांडणं .. दहा बाय दहाच्या खोलीत राहिलो आहे एवढा मोठा बंगला बापजाद्यानेही पाहिला नव्हता.अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार आहेत. त्याच्यातला सत्तार कधी डोक्यात येईल सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, हॉर्न वाजवल्याच्या वादातून झालेल्या राड्यावरही गुलाबराव पाटलांना सध्या गावात शांतता असल्याचं सांगत गाडीच्या किरकोळ वादातून आपसात भांडण झाल्याचं सांगितलं. गैरसमजूतीतून ही घटना घडल्याचं ते म्हणाले. आज गावात बैठक आहे. मोजक्या लोकांमुळे घटना घडली, संध्याकाळपर्यंत कर्फ्यूही काढला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा
संजय राऊत यांनी उद्ध्वजी, पवार यांनी अस्वस्थ केलंय. माझ्या मतदारसंघात संजय राऊत ठाण मांडून बसलेत. त्यानंतर काही झालं नाही.एकनाथ शिंदेंनी 57 जणांना निवडून आणले. आमच्या जिल्ह्यात आले. खाली चार पाय चार खांदे पुढे करत संजय राऊत आले. असं म्हणत गुलाबराव पाटलांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर टीका केली.
'नाराज आमदारांसाठी बैठका होतील'
बीडबाबत सखोल तपास होईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आमदारांची नाराजी दूर करण्याचं काम पक्ष करतील. त्यासाठी बैठका होतील. पालकमंत्रीपदाबाबत बोलायचं झालं तर प्रत्येकाला वाटतं आम्हाला बागायत शेती मिळावी, कोरवाहू मिळू नये.बंगल्यावरून काय भांडणं नाराज दहा बाय दहाच्या खोलीत राहिलो आहे एवढा मोठा बापजाद्यानेही पाहिला नव्हता.अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार आहेत. त्याच्यातला सत्तार कधी डोक्यात येईल सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना नुकतेच स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. निवडणुकांपूर्वीच त्यांचा भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्याशी वाद असल्याचं पाहायला मिळालं. तर, निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षातील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत त्यांचे खटके उडाल्याचंही दिसून येत आहे.