एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत डेरेदाखल, शरद पवारांनी थेट विधानसभेचं गणित मांडलं, जागांचा आकडा सांगितलं!

गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीत सामील होतील, असेही सांगितले जात होते.

मुंबई : लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील राजकारणात काही बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात, मराठवाड्याती दोन ते तीन नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता, त्यानंतर, आज माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवारांच्या (Sharad Pawar) प्रमुख उपस्थित सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. या प्रवेशावेळी, बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं. तसेच, विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, याचे गणितही त्यांनी सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीत सामील होतील, असेही सांगितले जात होते. अखेर आज भाजपच्या सर्व पदांचा राजीना दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी, बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं.  

निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत.  चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला लागलोय, एक उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येतायत, मागीलवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केलेला आहे.  मतदारांनी मतं दिली, विधानसभेत पाठवलं त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली. पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, जे निवडून आले होते, त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

विधानसभेला 225 जागा जिंकू

सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले आहेत, देवळालीतील देखील कार्यकर्ते आले आहेत.  हे घर तुमच्या सर्वांचं आहे, सध्या महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीनं लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 लोकांना निवडून दिलं, ही सुरुवात आहे. आता,  विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्या जागेत 225 पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असे भाकितच शरद पवारांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे, कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारं राज्य आणुया, सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूयात.  उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूयात, असे म्हणत शरद पवार यांनी सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशानंतर भाषणातून विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं. 

कोण आहेत सुधाकर भालेराव

सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र, भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भालेराव आता तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर महायुतीकडून उदगीर या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

सुधाकर भालेराव 10 वर्षे सभागृहात होते

सुधाकर भालेराव यांच्यावर आमचे बऱ्याच दिवसापासून लक्ष होते,  त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल होती. पण, विचारांचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो, मातंग समाजाचे देखील नेतृत्व त्यांनी केलंय. ते 10 वर्ष विधिमंडळात देखील ते होते. तसेच, महाराष्ट्रातून संघटन देखील त्यांनी निर्माण केलं आहे. पवार साहेबांनी 2019 सालीच सामाजिक न्याय खातं मागितलं होतं.  मागे राहिलेल्या घटकांसाठी विशेष प्रयत्न आपण करूयात.  विकासासाठी आपण काय करतोय? अल्पसंख्याक देखील आपण मागून घेतलं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांच्यावर देखील गोष्टी अवलंबून असतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.  

ऑगस्ट महिन्यात लातूर जिल्ह्यात जाऊ

महाराष्ट्रातातील रिपब्लिकन गट संलग्नित आहे,  भारदार आणि जोरदार वक्ता आम्हाला आज मिळतोय.  तुम्ही जिथून येता तिकडे आमचे अधिक लक्ष आहे. मराठी माणसाला सर्व सहन होतं. मात्र, फसवलेलं सहन होत नाही. मराठी माणसांना सुर्याची पिसाळसारखी लोकं आवडत नाहीत, गद्दारांना योग्य प्रायश्चित देण्याचे काम कराल. आपण नवीन आलोय असं त्यांना वाटू देऊ नका,  लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात वेळ द्यावा. त्याप्रमाणे मी पवार साहेबांना विनंती करेल,  योग्य वेळ द्यावा. विनायकराव पाटील यांच्या मतदारसंघात इथं देखील जायचं आहे.  लक्ष्मण मंडाले आणि अशोक पारडे यांचा देवळाली मतदारसंघातून पक्षप्रवेश देण्यासाठी कार्यकर्त्यांना आणलेलं आहे. इतर पक्षातून आणि आपल्याबरोबरचा गट गेलेला त्यातूनही काही लोकं येत आहेत.  त्या सर्वांचेच मी स्वागत करतो,  प्रचार करायला वेळ मिळाला नाही. आता, तुतारीचा प्रभाव इतका वाढला की तुतारी वाद्याला देखील लोकांपर्यंत पोहोचवले आहे. 10 मतदारसंघापैकी 9 ठिकाणी जनतेनं पवार साहेबांना उचलून धरलं.  एका नेत्याच्या मागे लोकांचं हे मोठं प्रेम आहे.  

सुप्रिया सुळेंनी लातूरच्या आठवणी जागवल्या

राष्ट्रवादी परिवारात आपलं स्वागत आहे, आपण लहानपणापासून एक संघटनेत काम करत आलोय.  अनेक आव्हाने समोर आलीत आणि त्यात आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांचे मी स्वागत करते, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.  लातूरशी आमचे रुणानुबंध आहेत,  लातूर भूकंपाची अनेकदा चर्चा होते, महत्त्वाचा जिल्हा आहे, राज्याचे मुख्यमंत्री देखील लातूरचे राहिले आहेत. विलासरावांची आठवण येतेच येते, त्यांनी आघाडी धर्म चांगल्या पद्धतीने पाळला. महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. 

जनतेनं भ्रष्टाचाराला नाकारलं

एमबीबीएस म्हणतो महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. क्राइम वाढतोय, हिट ॲंड रन वाढतोय. महाराष्ट्राचे झालंय काय? देश आपल्याकडून शिकायचा… इकडून तिकडून हे कॉपी करत आहेत.  राज्य स्वाभिमानी माणसांचं आहे. मराठी माणूस स्वाभिमानी आहे, त्यांनी भ्रष्टाचाराला नाकारलं आहे. 30 आले म्हणून हवेत नाही जायचं,  दीड लाखांच्या लीडनं आलोय, त्यामुळे आणखी मेहनत करावी लागेल. पक्ष, चिन्ह गेले तरीही जिंकलो.  तुतारी, पिपाणीचं अजूनही सुरुच आहे. कोर्टाच्या पायऱ्या चढतोय, कुठलीही पायरी चढू पण लढू. तुम्ही सांभाळा, आम्ही देखील सांभाळतो, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget