Eknath Shinde Press Conference : भाजप-महायुती मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल, एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Eknath Shinde Press Conference : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलंय.
Eknath Shinde Press Conference , Thane : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. महायुतीला महाराष्ट्रात 236 जागा मिळाल्या आहेत. 132 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 तर शिंदेंच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, 2022 मध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला होता. मात्र, मुख्यमंत्रिपद शिंदेंना देण्यात आले होते. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी (दि.27) पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद आहे
मी अगदी मनमोकळेपणाने काम करणारा माणूस आहे. सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद आहे. मी प्रधानमंत्री साहेबांना फोन केला. त्यांना म्हणालो, सरकारमध्ये निर्णय घेताना आमची कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेताना वाटू देऊ नका की, एकनाथ शिंदेची अडचण आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला गती -मानतेने निर्णय घ्यायचे आहेत. आता महायुती म्हणून आपली जबाबदारी वाढली. देशाला नंबर 1 बनवलंय. देशाचं नाव मोदींनी जगभरात केलं. याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. कोणतीही कोंडी राहू नये यासाठी तुम्हाला मी बोलावलंय.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर आपण पहिल्यांदा भेटतोय. महाराष्ट्रात विजय मिळला, हा सर्वांत मोठा विजय आहे. त्यामुळे जे काही अडीच वर्षात महायुतीने जे केलेले काम आहे. महायुतीने लोकांनी विश्वास दाखवलाय. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्हा पुढे नेली आहे. आम्ही कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घातली. आम्हाला मिळालेला विजय जनतेचा विजय आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि प्रचंड काम केलं. मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोप घेतल्यानंतर माझी सभा घ्यायचो. मी 80 ते 90 सभा घेतल्या. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. मुख्यमंत्री म्हणून कधी काम केलं नाही, कॉमन मॅन म्हणून मी काम केलं.
मी निश्चय केला होता, की महाराष्ट्रातील सरकार म्हणून सामन्य जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. सर्व सामान्यांच्या वेदना मी पाहिलेल्या आहेत. घरातील लोकांचे नियोजन मी पाहिले आहे. तेव्हा मी ठरवले होते की, माझ्याकडे जेव्हा अधिकार येतील, तेव्हा सर्व सामान्यांसाठी काही ना काही करेन, अशी भावना माझ्या मनात होती. श्रीमंत माणसाला गरिबांच्या वेदना समजत नाहीत. तेच मी यावेळी केलं. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने काहीना काही देण्याचा प्रयत्न केला. सरकार म्हणून सामन्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मी बाळासाहेबाांचे विचार घेऊन पुढे गेलो. जेव्हा आम्ही सरकार बदललं तेव्हा मोदी म्हणाले आम्ही तुमच्या पाठिशी राहू. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. मी मोदी आणि अमित शाह साहेबांना धन्यवाद देतो. आम्हाला आणि योजनांना त्यांनी पाठबळ दिलं. केंद्र आणि राज्यात सम विचारी सरकार आल्यानंतर प्रगतीचा वेग वाढतो. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक निर्णय आहेत. त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आम्ही पत्रकारांचे प्रश्न देखील सोडवले. आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळाली. राज्याचा प्रगतीचा वेग वाढला. आम्ही राज्य एक नंबरला नेण्याचे काम आम्ही केलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य 1 नंबरला होते. सरकार गेले तेव्हा मागे पडले मात्र, आता पुन्हा एक नंबरला आले आहे. या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला हा केवळ आणि केवळ आम्ही दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे झाला.
लाडक्या बहिणींनी दिलेले ओळख सर्व पदांपेक्षा जास्त आहे. मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. लढून काम करणारे लोक आहोत. मी स्वत: तुम्हाला सांगतो एवढा मोठा विजय झाला, तो ऐतिहासिक विजय आहे. याचं कारण म्हणजे जीव तोडून मेहनत घेतली, निर्णय घेतले. आम्ही मनापासून काम केलं.
वयोश्री योजना सुरु आहे, लाडक्या भावांना रोजगार मिळू लागलाय. गेल्या अडीच वर्षात जे जनतेचं प्रेम मिळालं. त्यांना वाटतं आपल्या परिवारातील किंवा घरातील मुख्यमंत्री आहे. मी प्रत्येला भेटलो. आज तुम्हीच लोकप्रियतेचे अंदाज काढले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल हे पाहून आम्ही काम केलं. अडीच वर्षात केंद्र सरकार आमच्या पाठिशी उभ राहिलं. मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या