एक्स्प्लोर

''होय, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला; मी नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार''

Eknath Shinde Press :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होते.

Eknath Shinde :  लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. ही ओळख सर्व पदापेक्षा मोठी वाटते. मी समाधानी आहे. नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार आमच्या मागे उभे राहिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आणि अमित शाह यांना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की, माझ्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुमच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला

महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आहेत. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आहे. त्यामुळं आम्हालामोठा विजय मिळाला. हा जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी पहाटेपर्यंत काम करत होते. दोन तीन तास झोप घ्यायचो असे एकनाथ शिंदे म्हणाले. 80 ते 90 सभा मी घेतल्या. मोठ्या प्रमाणात प्रवास मी केला आहे. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी मुख्यमंत्री म्हणून स्वताला कधीच समजलो नाही. मी कॉमन मॅन म्हणून वागलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे गप्प होते. त्यानंतर ते नेमके काय बोलणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. 

आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासीक

मी गरीब परिवारातून आलो , त्यामुळं मला सगळ्या वेदना समजत होत्या. लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी योजना सुरु केल्या. सरकार म्हणून सर्वसामान्य लोकांना आधार हवा असतो तो आम्ही दिला. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे गेल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अमित शाह हे अडीच वर्ष पूर्ण ताकतीनं मागे उभे राहिले. मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे आभार. त्यांनी निधी दिली,. पाठबळ दिला असेही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा प्रगतीचा वेग वाढल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासीक असल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांचे, सिंचनांचे निर्णय घेतले. राज्य एक नंबरला नेण्याचे काम आम्ही केले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. सहा महिन्यात आम्ही पहिल्या नंबरला आलो. मतांचा वर्षाव हा जे आम्ही काम केलं, निर्णय घेतले यामुळं झालेला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांना त्यांची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मात्र, जोपर्यंत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील  शुभ -दीप निवासस्थानी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे विविध नेते दाखल झाले आहेत. यामध्ये आमदार दादा भुसे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रताप सरनाईक हे दाखल झाले आहेत. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget