VHP On Bangladesh :...अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचे काम आम्ही करु;विश्व हिंदू परिषदेचा इशारा
VHP On Bangladesh :...अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचे काम आम्ही करु;विश्व हिंदू परिषदेचा इशारा
महाराष्ट्रात राहत असलेल्या अवैध-बांगलादेशी संदर्भात राज्य सरकारने कठोर भूमिका अवलंब करत त्यांना शोधून काढावे, अन्यथा अवैध बांगलादेशींना शोधण्याचे काम विश्व हिंदू परिषदेला हाती घ्यावे लागेल असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे... विश्व हिंदू परिषदेने यापूर्वीही अवैध बांगलादेशी शोधले असून त्यांना महाराष्ट्रातील विविध शहरातून शोधून काढणे विश्व हिंदू परिषदेसाठी कठीण नाही.. मात्र आम्ही राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवून राज्य सरकार समोर अडचण निर्माण करू इच्छित नाही असं मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी व्यक्त केले आहे... महाराष्ट्रातील विविध शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने अवैध बांगलादेशी राहत असून ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे... अशा सर्व अवैध बांगलादेशींना शोधून काढावं अशी मागणी आधीच आम्ही राज्य सरकारकडे केली असून राज्य सरकारने आमच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा विहीपने व्यक्त केली आहे...