Eknath Khadse : गिरीश महाजन पागल झाले, एकनाथ खडसेंच्या संतापाचा कडेलोट; काय काय म्हणाले?
Eknath Khadse on Girish Mahajan, Jalgaon : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केलीये.
Eknath Khadse on Girish Mahajan, Jalgaon : अनेक वर्ष एकाच पक्षामध्ये असलेल्या अनेक नेत्यांमध्ये देखील मतभेद पाहायला मिळतात. मंत्री गिरीश महाजन आणि अनेक वर्ष भाजपसाठी काम केलेल्या आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंमधील वैर आता महाराष्ट्रातील लोकांसाठी नवं राहिलेलं नाही. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी सातत्याने एकमेकांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सून आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी दोघांमधील राजकीय वैर कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बोलले गेले. मात्र, एकनाथ खडसे यांनी आज (दि. 5) पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली आहे.
एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. नाथाभाऊ वर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याच दुःख त्यांना नाही. पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही.
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे राजकीय विरोधी पक्षात असल्याने त्यांच्यामध्ये राजकीय विरोध असणे स्वाभाविक असले, तरी भाजपा कडून केंद्रात मंत्री पदावर असलेल्या मंत्री रक्षा खडसे यांच्यासाठी मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद डोकेदुखी ठरतोय. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याची चर्चा होती.
संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी : एकनाथ खडसे
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना शिक्षा कशी होईल या दृष्टीने शासनाने पावलं उचलावी, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या