एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर, दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल

Deepak Kesarkar : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर लावण्यात आला आहे.

Sindhudurg News : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर लावण्यात आला आहे. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी (Sawantwadi) मतदारसंघात वेंगुर्लेमधील (Vengurla) पाट परुळे भागात त्यांना विरोध करणारे बॅनर (Banner) लागले आहेत. त्यावर 'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता', अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत. हे बॅनर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनवला आहे. दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर

भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता... पाच वर्षांत तुम्ही आम्हाला तोंडही दाखवलं नाही. आतापर्यंत आले नाही त्यामुळे यापुढेही येऊ नका कोपरापासून तुम्हाला हात जोडतो, अशा आशयाचा मजकूर असलेलं बॅनर शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. केसकर यांच्याबद्दल त्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल

मालवणी बोलीभाषेतून या बॅनवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.

बॅनरमध्ये काय लिहिलं?

प्रिय दिपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्च्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका... भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतातMumbai Jan Aakrosh Morcha : Santosh Deshmukh , Somnath Suryawanshi प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चाABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 25 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सJanaakrosh Morcha :संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीना न्याय द्या,  मेट्रो सिनमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Embed widget