एक्स्प्लोर

भाजपच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजी नाट्य, काटोलमधून चरण ठाकूर यांना संधी? आशिष देशमुखांची तडकाफडकी मुंबईवारी 

उमेदवारांची घोषणा करण्यात भाजपने बाजी मारली असली तरी या पहिल्या यादीवरून अनेक ठिकाणी पक्षात नाराजी नाट्य रंगतान बघायला मिळत आहे. असाच काहीसा वाद नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात उफाळून आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election 2024 ) भाजपकडून (BJP) पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.

काटोलमधून चरण ठाकूर यांना संधी?

दरम्यान, विदर्भातील 23 मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह 19 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कामठी, देवळी, अचलपूर, आमगाव या उर्वरित 4 ठिकाणी माजी आमदार किंवा इतर इच्छुकांना संधी देण्यात आली आहे. अशातच या यादीत 23 मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असले, तरी विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या 10 मतदारसंघात भाजपने त्यांचे विद्यमान आमदार असतानाही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. ज्या 10 मतदार संघात भाजपचे आमदार असतानाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांची घोषणा करण्यात भाजपने बाजी मारली असली तरी या पहिल्या यादीवरून अनेक ठिकाणी पक्षात नाराजी नाट्य रंगतान बघायला मिळत आहे. असाच काहीसा वाद नागपूर जिल्ह्याच्या काटोल विधानसभा मतदारसंघात (Katol Assembly Constituency) उफाळून आला आहे.

काटोल मतदारसंघात भाजपमधील अंतर्गतवाद मुंबई दरबारी 

नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपचं तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची चर्चा असल्याने स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. काटोल मतदारसंघाची भाजपची तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच मतदारसंघातून भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh)हे विधानसभेची तयारी करत होते.  परिणामी, भाजप नेते आशिष देशमुख हे आता तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहे. काटोलमध्ये 2019 ला पराभूत झालेले चरण ठाकूर यांना उमेदवारीची शक्यता असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आशिष देशमुख आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आपले मत मांडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काटोल मतदारसंघात भाजपकडून कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

विधानसभा निवडणूकीत सावनेरमध्ये दोन भाऊ आमने-सामने 

दरम्यान, सावनेर अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आणि सध्या भाजपचे नेते असलेल्या आशिष देशमुख यांचाही जुना मतदारसंघ आहे. आशिष देशमुख हे देखील सावनेरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे अमोल देशमुख यांनी काँग्रेसमधून सावनेरवर दावा केल्यानं दोन्ही भावांमध्ये लढत होण्याचीही शक्यता आहे. मात्र, आशिष देशमुख आधीच सावनेर मतदारसंघ सोडून गेले आहेत. त्यानंतर सुनील केदार यांच्या बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन निर्णय आल्यानं मी सावनेरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

आशिष देशमुख सावनेरमधून भाजपचे उमेदवार राहतील का? याचा निर्णय त्यांचा पक्ष करेल. काँग्रेस पक्षाचा निर्णय काँग्रेसचे नेते करतील. भविष्यात काय होईल, हे आज सांगता येणार नाही.  त्यामुळे सावनेरमध्ये दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष होईल का? हे पक्षश्रेष्ठी आणि देवावर सोडतो, देव रस्ता काढेल त्याप्रमाणेच पुढे जाऊया अशी प्रतिक्रिया अमोल देशमुख यांनी दिली आहे. माझ्या वडिलांचा आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Embed widget