एक्स्प्लोर

Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका, लोकसभेच्या सरचिटणीसांकडे नोटीस

North West Mumbai Lok Sabha constituency: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. ही मतमोजणी वादग्रस्त ठरली होती.

मुंबई: रवींद्र वायकर यांचे लोकसभा निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून (North West Mumbai Lok Sabha constituency) लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह (Bharat Shah) यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode) यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे. लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांना इमेल द्वारे सुद्धा हे नोटिसीपत्र पाठविल्याचे ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले.

या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणी बाबत FIR दाखल झाला आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल, असे भरत शहा यांच्यातर्फे पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी भरत खिमजी शाह यांनी ऊच्च न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे.

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

नोटीसपत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की, अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून श्री रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो तो फोन ईव्हीएम मशीनसोबत जोडलेला होता असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि तपास / चौकशी आहे. ईव्हीएम द्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजप ला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा अनेकदा होत असतांना यावेळी प्रथमच अश्याच संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे त्यामुळे ज्या रवींद्र वायकर यांचे निवडून येणे प्रथमदर्शनीच शंकास्पद आहे त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी मागणी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांच्याकडे हिंदू समाज पार्टीच्या भरत खिमजी शाह यांनी केली आहे. 

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहे, असेही भरत खिमजी शाह यांनी नमूद केले आहे. 

आणखी वाचा

अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Embed widget