एक्स्प्लोर

अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावली नुसारच पार पाडण्यात आल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावली नुसारच पार पाडण्यात आल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे. विहित नियमांनुसार मतमोजणी प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दि 4 जून 2024 रोजी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची मोजणी ही विहित वेळेत म्हणजे सकाळी 8 वाजता सुरु करण्यात आली. 

'ईव्हीएम' मशीनवरील मतमोजणी साडेआठ वाजता सुरु करण्यात आली. फेरीनिहाय मत मोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत उमेदवारांना मिळालेली मते मतमोजणी टेबलवर फॉर्म क्रमांक 17 C भाग 2 मध्ये भरून त्यावर मतमोजणी प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीअखेर संबंधित फेरीत तसेच फेरीअखेर सर्व उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जाहीर करण्यात येत होती. यानुसार 25 व्या फेरीची मतमोजणी जाहीर होत असताना टपाली मतपत्रिकांची मतमोजणी संपली, त्यामुळे पंचविसाव्या फेरीची तसेच पंचविसाव्या फेरी अखेरची मतमोजणी जाहीर झाल्यानंतर टपाली मतपत्रिकांच्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. 

ज्यामध्ये उमेदवार अमोल कीर्तीकर यांना 1501 तर उमेदवार रवींद्र वायकर यांना 1550 मते प्राप्त होती. नियमाप्रमाणे टपाली मतपत्रिकांची संख्या 'ईव्हीएम' मतमोजणीच्या सर्व फेऱ्यानंतरची ज्यात बेरीज केली जाते. त्यामुळे 26 व्या फेरीतील मतदान यंत्रांची मतमोजणी संपल्यानंतर 26 व्या फेरीतील 26 व्या फेरीअखेर मतदान यंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार  अमोल कीर्तीकर हे 1 मतांनी आघाडीवर होते. नियमाप्रमाणे 26 व्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उमेदवार वायकर हे 48 मतांनी आघाडीवर होते 

टपाली मतपत्रिका पुन:परिक्षण 

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतमोजणी अखेर जर आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक बाद टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतःहून सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत बाद टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण करणे बंधनकारक असल्याने व 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात बाद टपाली मतपत्रिकांची संख्या 111 इतकी असल्याने या सर्व बाद टपाली मतपत्रिकांचे पुनर्परीक्षण उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तपासणीअंती टपाली मतपत्रिकांच्या मोजणी संख्येत काहीही फरक पडला नाही.

मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती

यानंतर दोन्ही केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांनी आवश्यक असलेले प्राधिकार दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल तसेच विजयी उमेदवार 7.53 वा जाहीर केला व श्री कीर्तीकर यांच्या प्रतिनिधींनी 08.06 वाजता पुनर्मतमोजणीचे लेखी पत्र सादर केले. त्यांनी घेतलेली हरकत ही विहित मुदतीनंतर होती तसेच त्यांनी कोणतीही मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया तसेच 'व्हीव्हीपॅट' मोजणी दरम्यान कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती असे 27- मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Lok Sabha Elections Results 2024 Live : PM मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा, एनडीएच्या बैठकीनंतर घेणार राष्ट्रपतींची भेट; राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget