'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Omraje Nimbalkar and Archana Patil : रॅलीत पैसे वाटल्याच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तेरणा रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत झालेल्या उपचारांची माहिती घेण्यात येणार आहे.
धाराशिव: शिवसेना (Shiv Sena) उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राष्ट्रवादी (NCP) उमेदवार अर्चना पाटील (Archna Patil) यांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसीनंतर निवडणूक आयोग (Election Commission) अॅक्शन मोडवर आला आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलीस सायबर विभाग व आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच रॅलीत पैसे वाटल्याच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तेरणा रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत झालेल्या उपचारांची माहिती घेण्यात येणार आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत बोलताना तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले असा आरोप राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी 500-1000 रुपये देऊन गर्दी जमा केल्याची तक्रारही ओमराजे निंबाळकर केली होती. या तक्रारीच्य अनुषंगाने
पाटील आणि निंबाळकर यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नोटीस (Notice) पाठवण्यात आली होती. तसेच
तेरणा ट्रस्टच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत झालेल्या उपचाराची माहिती आणि स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहे.
व्हिडीओची सत्यता पडताळून अहवाल सादर करण्याचे आदेश
प्रचार रॅलीत पैसे पाठवल्याच्या दोन्ही व्हायरल व्हिडीओतील प्रचार रॅलीत पैसे वाटल्याच्या दोन चित्रफितीतील मजकूर व संवादाची सत्यता पडताळून अहवाल सादर करण्याचे सायबर विभागाला आदेश देण्यात आले आहे. धाराशिव लोकसभेत पाटील व निंबाळकर यांनी परस्पर विरोधी आचार संहिता भंगाची तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले. मात्र लोकांना मोफत उपचार केले असे सांगितले असा ओमराजे यांचा आरोप होता. तो चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी तक्रार केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांच्या वतीने लोकांना 500/1000 रुपये प्रलोभन देऊन गर्दी जमा केल्याची तक्रार ओमराजे यांनी केली आहे
सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश
या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :