Raigad Lok sabha Election : दापोली मतदारसंघातून 25 हजाराच्या आत लीड घेतली तर मी निवडणूक लढणार नाही; योगेश कदमांचं अनंत गितेंना आव्हान
Raigad Lok sabha Election : 2019 ची निवडणूक गीते आमच्या पैशावर जिंकून आले, तेव्हा पापाचा पैसा नव्हता का? असा सवाल देखील योगेश कदमांनी अनंत गीतेंना केला आहे.
रायगड : दापोली मतदारसंघातून (Dapoli) 25 हजाराच्या आत लीड घेतली तर मी निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांनी (Yogesh Kadam) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनंत गीतेंना (Anant Geete) आव्हान दिले आहे. 2019 ची निवडणूक गीते आमच्या पैशावर जिंकून आले, तेव्हा पापाचा पैसा नव्हता का? असा सवाल देखील योगेश कदमांनी अनंत गीतेंना केला आहे.
योगेश कदम म्हणाले, मागील 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदम घरण्यामुळे आणि शिवसेनेमुळे अनंत गीत खासदार झाले. आज ते पापाचा पैसा म्हणत आहे परंतु आमच्यात पैशाच्या जोरावर ते 2019 सालच्या निवडणुकीत जिंकून आले. संपूर्ण रायगड मतदारसंघातील सर्वात जास्त लीड हे आम्ही त्यांना दापोली मतदारसंघातून मिळवून दिले होते. आता योगेश त्यांच्यासोबत नाही. कदम घराणे संपवण्याची भाषा दूर राहिली. परंतु गीते लोकसभेची तर सोडाच साधी ग्रामपंचायतची निवडणूक देखील जिंकू शकत नाही. माझे त्यांना खुले आव्हान आहे की, दापोली मतदार संघातून 25 हजाराच्या आत लीड घेतली तर योगेश कदम आयुष्यात कधी निवडणूक लढवणार नाही.
अनंत गीते दोन लाख मतांनी पराभूत होतील: योगेश कदम
अनंत गीते दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. गिते ग्रामपंचायतची निवडणूक देखील जिंकू शकत नाही, अशी टीका देखील योगेश कदमांनी यावेळी केली आहे. रायगड मतदारसंघाने गेल्या वेळच्या निवडणुकीत गितेंना नाकारले आहे. जवळपास 38 हजाराच्या मतांनी ते निवडणूक हरले होते. आता ही निवडणूक ते दीड ते दोन लाखांच्या फरकाने 100 टक्के हारणार आहे. हा पराभव त्यांना दिसत आहे. म्हणून ते बेताल वक्तव्य करत आहेत. रामदास कदमांनी खेड तालुक्यासाठी काय केले हे खेड तालुक्यातील जनता जाणते. येत्या 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या मेळाव्यातून अनंत गितेंना चोख उत्तर दिले जाणार आहे.
कुणबी समाज गितेंना लाथ मारुन बाहेर काढेल :योगेश कदम
गितेंना रायगड लोकसभा मतदारसंघात मत मागण्याचा अधिकार नाही. त्यांनी रायगड मतदारसंघ भकास केला आहे. 36 वर्षे खासदार असून एकही उद्योग जिल्ह्यात आणला नाही . रोजगाराचा प्रश्न सोडवता आला नाही. कुणबी समाजाच्या नावावर ते मत मागत आहेत, तोच कुणबी समाज त्यांना लाथ मारुन बाहेर काढेल, असा विश्वास आहे, असे योगेश कदम म्हणाले.
हे ही वाचा :
रायगडमध्ये यंदाही 'सेम टू सेम' नावांचा खेळ, कोणाचं गणित बिघडणार, पुन्हा एकदा 2014 चा पॅटर्न?