एक्स्प्लोर

Dhananjay Munde VIDEO: अजित पवारांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, धनंजय मुंडे यांचा सुनील तटकरेंना शब्द!

NCP 25th Foundation Day : धनंजय मुंडेंनी महाराष्ट्रभर फिरावं आणि पक्षवाढीसाठी कार्य करावं, यावेळी सर्दी पडशाचं काही कारण चालणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. 

मुंबई : याआधी 2014 ते 2019 या काळात चार वेळा महाराष्ट्र पालथा घातला, आता माझ्या सर्दी पडशाची आठवण तुम्हाला आली, पण अजित पवारांच्या (Ajit Pawar) पायाची शपथ घेऊन सांगतो आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा शब्द धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला. ते राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात (NCP 25th Foundation Day) बोलत होते. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना वरिष्ठ नेत्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. धनंजय, आता तुझ्या सर्दी पडशाचं निमित्त चालणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले. त्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट अजित पवारांची शपथ घेऊन त्यांना महाराष्ट्र पालथा घालण्याचं आश्वासन दिलं. 

सर्दी-पडसं झालं तरी थांबणार नाही

धनंजय मुंडे म्हणाले की, आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल, पण 2014-2019 या काळात मला ना सर्दी होती ना पडसं होतं. पण आता दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, विधासभेलाच नव्हे तर तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका असो वा नगरपरिषद, जोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी-पडशाचा तुम्हाला त्रास होणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन. 

त्यावेळी सर्दी पडशाची आठवण झाली नाही

या निवडणुकीत काही ही झाल तरी येणारी वेळ ही घड्याळाचीच असेल. गेल्या 25 वर्षांत लोकांची सेवा करण्यात सिंहांचा वाटा हा दादांचा आहे. 2014 मध्ये पराभव होण्याऱ्यांत मीही होतो. त्यावेळी दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली. तर दुसरीकडे दादांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत होता. ⁠कोणाच्या सांगण्यावरुन केलं हे आता सांगायची गरज नाही. 2014 ते 2019 या काळात मी तीन वेळा महाराष्ट्र पालथा घातला. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्यांना आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो असा विश्वास दिला. त्यावेळी माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली नाही. पण आज माझ्या सर्दी पडशाची  आठवण झाली असेल.

मी तुम्हाला आजच सांगतो, अगदी जिल्हा परिषद निवडणूक असली तरी मी थांबणार नाही. ⁠जर कोणत्या सहकाऱ्याच्या नाकाला धार लागली तरी रुमाल घेऊन मी असेन. बारामतीची जागा हरलो तरी याचं फार दुःख करु नका. ⁠कारण विकास आणि सहानुभुतीचा तराजू जर केला तर सहानुभूतीच दाखवेल. त्यामुळे याच शल्य पूर्णपणे विधानसभेला भरुन काढू. 

मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची दादा तुम्हीच वाढवण्याचा निर्णय घेतला. ⁠सोशल मीडियाचा जमाना आहे. ⁠मात्र सोशल मीडियावर अवलंबून राहता येणार  नाही, तर घराघरात पक्ष पोहचावा लागेल असं धनंजय मुंडे म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Embed widget