Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
Amit Shah In Sangli : मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं असल्याचे अमित शाह म्हणाले.
Amit Shah In Sangli : शरद पवार शेतकरी, शेतकरी करत असतात पण मोदींनी शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्याचं काम केलं. शरद पवार यांनी दहा वर्षे सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय दिले हे सांगावं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली असल्याचे अमित शाह म्हणाले. सांगलीमधील शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ बोलताना अमित शाह यांनी शिराळच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक बनवू अशी घोषणा केली.
त्यांनी सांगितले की, 20 तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. आपल्या सगळ्यांना निर्णनायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे. देवेंद्र आणि एकनाथ यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता 1500 नंतर 2100 रुपये महिला दिलं जाणार असल्याचे ते म्हणाले.
पण मोदींनी पाच वर्षांमध्ये मंदिर उभा केलं
अमित शाह यांनी बोलताना सांगितले की राम मंदिराचा मुद्दा 75 वर्ष काँग्रेसने भिजत ठेवला होता, पण मोदींनी पाच वर्षांमध्ये मंदिर उभा केलं आहे. राम मंदिरात शरद पवार, उद्धव ठाकरे जाणार होते, राहुल गांधी सुद्धा जाणार होते, पण यांची व्होट बँक वाचवण्यासाठी ते अजून अयोध्येला गेले नाहीत, अशी टीका अमित शाह यांनी केली. ते पुढे म्हणाले की नागपूजा परंपरागत पुन्हा चालू होईल. महाविकास आघाडीवाले वक्फ बोर्डाकडे जमीन देण्याचं काम करतील. पण जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत मंदिर आणि मंदिराच्या जमिनीला कुणाला हात लावू देणार नाही. अमित शाह म्हणाले की, औरंगाबादचे नाव संभाजी नगर व्हायला पाहिजे की नको? पण हे महाविकास आघाडी वाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे देखील याला विरोध करत आहेत. मी इथून शरद पवार यांना सांगतो की, औरंगाबादचे नाव वीर संभाजीनगर होणार. शरद पवार ऐका तुमच्या चार पिढी आली तरी 370 कलम बदलणार नाही.
महाविकास आघाडीचा सुपडासाफ होणार आहे
त्यांनी सांगितले की, आम्ही पुलवामा झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला, पण राहुल बाबा म्हणतो की याचा काही पुरावा आहे का? अरे राहुल बाबा जरा पाकिस्तानचे चेहरे टीव्हीवर बघा. हरियाणामध्ये हे आघाडी वाले फटाके घेऊन बसले होते. मात्र, त्यांनी फटाके भाजपच्या नेत्यांना दिले, तिथं सुपडासाफ झाला. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचा सुपडासाफ होणार आहे. मी सत्यजित देशमुख यांना विनंती करतो की नाग पूजा सुरू झाल्यानंतर मला आपण बोलवा मी नक्की याठिकाणी नाग पूजा करण्यासाठी येईन.
आघाडीवाले आपली वोट बँक टिकवण्याचे काम करत आहेत
आघाडीवाले आपली वोट बँक टिकवण्याचे काम करत आहेत. वक्फ बोर्डासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे त्यांची वोट बँक कोण आहे समजलं का? आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवतील .शरद पवार आपल्या मुलीला मुख्यमंत्री करणार आहेत. काँग्रेसमध्ये तर डझनभर लोक कपडे शिवून तयार आहेत, पण भाजपमध्ये असं होतं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितले की जी आश्वासन दिली जातात ते जपून करा. कारण काँग्रेस कधी आश्वासन पूर्ण करत नाही, पण आम्ही जे शब्द देतो ते पूर्ण करतो असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या