Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी एकही काम न करता 16 कोटी 48 लाखांची बोगस बिलं उचललीत; सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas : तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काही काम न करता बोगस बिल सादर करत तब्बल 73 कोटी 36 लाख रुपये उचलत भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
Suresh Dhas : बीड परळी मतदारसंघात 2021 ते 2024 या काळात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काही काम न करता बोगस बिल सादर करत तब्बल 73 कोटी 36 लाख रुपये उचलत भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे, कुठल्याही एका मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस बिलं उचलल्याचे एकही उदाहरण नाही. दरम्यान मी पाच टर्मचा आमदार असून माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात मी असा उद्योग कधीही पाहिला नसल्याचेही आमदार सुरेश धस म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाच्या यादी माझाकडे आहे. एकरूपयांचे ही काम नं करता कोट्यावधी रुपयांची बील यात उचलण्यात आली आहेत. दरम्यान उद्या डीपीडीची बैठक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बीड जिल्ह्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने आमचा हाच विषय असणार आहे. तसेच या संदर्भातील तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे ही करणार आहे. आपले शागिर्द किती चांगल्या पद्धतीने कारभार करताय हे कळलं पाहिजेल, असेही आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले.
आपले शागिर्द कसे कारभार करतात हे अजित दादांना सांगू- सुरेश धस
अजित दादा हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. ते सात वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत, दरम्यान माझेही काही काळ ते नेते राहिले आहेत. त्यामुळे ते माझा एकेरी उल्लेख करू शकतात. मी लहान असल्याने माझा एकेरी उल्लेख केला काय किंवा अजून काही बोलले काय, त्याचं मला फार काही वाटत नसल्याचेही सुरेश धस म्हणाले. अजितदादा रागा रागात बोलतात. मात्र नंतर ते प्रेमही करतात, त्यामुळे अडचण नाही. मात्र त्यांनी एवढेही प्रेम करू नये की 70- 70 कोटींची बोगस बिले उचलतील, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बीडचे बजेट 400 कोटींचे, त्यातील 90 टक्के पैसे परळीत- सुरेश धस
बीड जिल्ह्याचे जिल्हा नियोजनचे बजेट 400 कोटींचे आहे. त्यातील 90 टक्के पैसे परळीला घेऊन जायचे आणि 10 टक्के जिल्ह्यातील इतर भागाला द्यायचे. लाखो मतांनी ते (धनंजय मुंडे) निवडून नाही यायचे तर काय होणार? असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'नायक' चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तसा संजय मुंडे हा अधिकारी एक दिवसासाठी कार्यकारी अभियंता होतोय. कुणाची शेळी कुणाला पिते हेच कळेना. दरम्यान अजित पवारांच्या 10-15 पीए यांना याबाबत माहिती देणार असल्याचे ही सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा