एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अजितदादांसोबत नॅचरल युती नव्हती, राजकीय युती, पुढील काही वर्षात ती नॅचरल होईल : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Ajit Pawar, मुंबई : "अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी केलेली युती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय युती होती. आजही आमची आणि अजितदादांची युती राजकीय आहे."

Devendra Fadnavis on Ajit Pawar, मुंबई : "अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी केलेली युती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय युती होती. आजही आमची आणि अजितदादांची युती राजकीय आहे. कदाचित या निवडणुकीत ती थोडी सेटल झाली. पुढील काही निवडणुकांमध्ये आणखी सेटल होईल. पुढील 5-10 वर्ष गेले तर कदाचित त्यांच्यासोबतची युतीही नॅचरल होईल. आजच अजितदादांशी युती नॅचरल आहे असं विचारत असाल तर ती नाहीये. मी याबाबत स्पष्टपणे बोलतो", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

विधानसभा निवडणूक महायुती एकत्रित लढणार 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची महायुतीतून एक्झिट वगैरे होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष आणि इतर छोटे पक्ष आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुती जी लोकसभेला होती, तीच महायुती विधानसभेला असणार आहे. 

राजकीय फायद्यासाठी फोटो व्हायरल करण्यात आले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, हिंदुस्तानचं आराध्य दैवत आहे. पुतळा कोसळला त्या घटनेचं ज्या प्रकारे राजकारण केलं जातं. आपल्या दैवताचे मूर्ती भंजन झाल्यानंतर आपण त्याचे फोटो व्हायरल करतो का? राजकीय फायद्यासाठी फोटो व्हायरल करण्यात आले. अशावेळी वक्तव्य अतिशय संवेदनशीलपणे केली पाहिजेत. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपयश 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता त्याचा अजित पवारांसोबत त्यांनी युती केल्याची टीका विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अजित पवार , एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रितपणे निवडणकीला सामोरे गेले. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात पराभवला सामोरे जावे लागले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ramdas Kadam: उद्धव ठाकरेंना मी बोललो होतो, दोन तासांत आमदारांना परत आणतो; पण त्यांनी ऐकलं नाही: रामदास कदम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande :  मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19 Sept 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget