Devendra Fadnavis : मला शिट्टी वाजवता येत नव्हती, पण तेजाब चित्रपट लागला होता; देवेंद्र फडणवीसांनी जुन्या आठवणी सांगितल्या
Devendra Fadnavis, मुंबई : "तुमच्या शिट्ट्या ऐकल्यानंतर मी कॉलेज जीवनात पोहोचलो. मला शिट्टी वाजवता येत नव्हती, पण तेजाब चित्रपट लागला होता. एक दोन तीन गाणे वाजले की अशी शिट्ट्या वाजायच्या मला तो प्रसंग आठवला", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
Devendra Fadnavis, मुंबई : "तुमच्या शिट्ट्या ऐकल्यानंतर मी कॉलेज जीवनात पोहोचलो. मला शिट्टी वाजवता येत नव्हती, पण तेजाब चित्रपट लागला होता. एक दोन तीन गाणे वाजले की अशी शिट्ट्या वाजायच्या मला तो प्रसंग आठवला", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
खरे खाद्य हे तुमचे प्रेम व उत्साह आहे, तुमच्या उत्साहाने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा उत्साह पाहिल्यानंतर मला परवा जेव्हा वर्ल्ड कपमध्ये भारत टीम जिंकली, तोच उत्साह पाहायला मिळाला. आम्ही राजकीय लोक आहोत, खरे खाद्य हे तुमचे प्रेम व उत्साह आहे. तुमच्या उत्साहाने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. आजचा कार्यक्रम उर्जा देणारा आहे. भूषण गगराणी यांनी सांगितले होते, बैठक मी घेतला नाही तर मी सही कशी करू. तेव्हा मी चहल यांच्यासोबत बोललो व नंतर प्रश्न सुटले. असा कार्यक्रम मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखादे काम हाती घेतले की त्याचा पाठपुरावा करायचा व ते काम पूर्ण करून घ्यायचे ही प्रसाद लाड यांची हातोटी आहे. विजय कांबळे यांनी सांगितले होते, प्रसाद जी तुम्ही हे काम हाती घ्या. ते माझ्याकडे आले तेव्हा मी सांगितले. चांगले काम आहे पण खूप मेहनत घ्यावी लागेल. ती क्षमता त्यांच्यात होती. म्हणून आज कामगार नेता कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांनी दाखवला आहे. मला धन्यवाद दिले, पण हे धन्यवाद प्रसाद लाड यांना करायला हवे. त्यांनी प्रश्न समजून घेत माझ्याकडे पाठपुरावा केला.
तुमच्या मेहनतीची पाइ नी पाई मी देणार, हा माझा शब्द आहे
मला माहिती आहे, पूर्ण पैसे आलेले नाहीत. पण उरलेले पैसे मिळतील, याची पूर्ण खात्री मी देतो. तुमच्या मेहनतीची पाइ नी पाई मी देणार, हा माझा शब्द आहे. हे कार्य आम्ही अर्धवट सोडणार नाही. बेस्टचा मोठा इतिहास आहे. 150 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने लोकांच्या प्रवासाची जबाबदारी स्वीकारलीफीडरचे काम बस सेवा करू शकते. कारण ती कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकते. त्यासाठी बेस्ट अधिक सक्षम करावी लागेल. बेस्ट वेळ पाळते, ही खासियत आहे. मुंबईकर तुम्ही देशाच्या कुठल्याही बसस्टॉपजवळ लाईन लावून चढताना दिसत नाहीत. मुंबईकर हे शिस्त पाळतात. ही लाईफ लाईन आहे, मेट्रो सुरु करताना बेस्टचे काय होणार हे विचारत होते. मी सांगितले होते, कुठल्याही व्यक्तीस 500 मीटर अंतरात वाहतुकीचे साधन मिळाले पाहिजे. म्हणून जिथे मेट्रो, रेल्वे आहे, त्या या करिता यशस्वी झाल्या कारण तिथली बस सेवा उत्तम आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या