(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Charanjit Singh Channi: चन्नी यांची पक्षातून हकालपट्टी करा, पंजाब पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी केली मागणी
पंजाब (Punjabi) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेसमधील धुसफूस वाढली आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत.
Charanjit Singh Channi: पंजाब (Punjabi) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेसमधील धुसफूस वाढली आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत. चन्नी यांच्या चेहऱ्यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप होऊनही पक्षाने निवडणुकीत चेहरा बदलला नाही, असे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी म्हटले आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल करत काँग्रेस नेते दर्शन बराड म्हाणाले आहेत की, चन्नी यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी. चन्नी यांना आपल्या कुटुंबातील सर्व लोकांच्या नोकऱ्या सोडवून त्यांना काँग्रेसमध्ये सामील करायचे होते. चन्नी यांचा भाऊ काँग्रेसविरोधात निवडणूक लढला. चन्नी यांनी ही त्यांना थांबवले नाही. चन्नी आणि जाखड यांची पक्षातून हकालपट्टी करून नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्याकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी द्यावी, असं बराड म्हणाले आहेत.
याआधी माजी राज्य काँग्रेस प्रमुख सुनील जाखड यांनी चन्नी हे पक्षावर एक ओझे असल्याचे म्हटले होते. चन्नी यांच्या लालसेमुळे पक्षाची ही अवस्था झाली असल्याचेही ते म्हणाले होते. दरम्यान, 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) 92 जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि केवळ 18 जागा जिंकता आल्या. यामध्ये काँग्रेस पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा देखील पराभव झाला आहे.
संबंधित बातम्या:
- Punjab Election 2022 : आम आदमी पक्ष रचणार इतिहास! पंजाब विधानसभेला मिळणार प्रथम महिला सभापती
- भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा, 16 मार्चला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
- Punjab News: भगवंत मान यांनी केला सरकार स्थापनेचा दावा, मंत्रिमंडळात 17 मंत्र्यांचा होऊ शकतो समावेश
- Punjab Election News : मुख्यमंत्र्यांना पराभूत करत मुलगा झाला आमदार ; पण सफाई कामगार आई पोहोचली कामावर