भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात काटे की टक्कर, विधानपरिषदेसाठी काँग्रेसची रणनिती काय?
Vidhan Parishad Election 2022 : सामोवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप निवडणूकीच्या रिंगणात असतील.
Vidhan Parishad Election 2022 : सामोवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप निवडणूकीच्या रिंगणात असतील. यात भाई जगतापांची जागा तुलनेनं डेंजर झोन मध्ये मानली जात आहे. विधानपरिषद निवडणूकीत मुख्य लढत काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांमध्ये आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांनी जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाई जगताप दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटींग आणि अपक्षांवर असणार आहे.
काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे, काँग्रेस कोट्यातील मतांचे गणित
- पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील.
- मात्र, भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडतात.
- या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरू.
शिवसेनेकडील अतिरीक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला तर काँग्रेसची दुसरी जागा सेफ होईल. तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसोबत काँग्रेस शिष्ठमंडळाच्या सातत्यानं बैठका सुरू आहेत.
अपक्ष आणि लहान पक्षांचे गणित काँग्रेस कसे जुळवणार
समाजवादी पक्षच्या आमदारांसोबत काँग्रेसच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र सपा0 आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसपैकी कोणाला मतदान करायचे, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत घेतील. काँग्रेसकडून भाई जगतापांनी बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकुरांची भेट घेतली आहे. बविआ कोणाला मतदान करेल हे अदयाप गुलदस्त्यात आहे. तसेच बच्चु कडूंनी मविआला समर्थन दिले आहे. कोणाला मतदान करणार हे ठरणे बाकी असल्याचे समजते आहे. याशिवाय शेकाप, मकाप स्वाभिमानी, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचेही महाविकास आघाडीला समर्थन आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Vidhan Parishad Election : भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स, पण त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार: रोहित पवार
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट