एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स, पण त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार: रोहित पवार 

MLC Election 2022 : विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ती काळजी घेऊ, कुणाची विकेट पडणार ते उद्याच समजेल असं आमदार रोहित पवार म्हणाले.

मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, त्यासाठी सर्व रणनीती तयार केली जात आहे असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे, पण त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असंही ते म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, "राज्यसभेच्या निवडणुकीतमध्ये अनपेक्षित फटका बसला, पण या निवडणुकीमध्ये आम्ही त्या संबंधी काळजी घेत आहोत. कुणाची विकेट पडेल हे उद्याच समजेल. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने वेगळी खेळी खेळली आणि निवडणूक जिंकली. पण भाजपला आता ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल."

शिवसेना नाराज नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "एखादी मॅच आपण हारतो, त्यातून आपल्याला शिकावं लागेल. आताही पीच तेच आहे, विरोधकही तेच आहे आणि भाजपकडून तोच दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांची दखल आपण घेऊ. पण भाजप नक्कीच थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात."

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर जाहीर आरोप केले, ते व्हायला नको होते. पण नंतर नाराजी दूर केली गेली, आमच्याकडे संवाद आहे असंही रोहित पवार म्हणाले.

विधानपरिषदेच्या रिंगणात पाच उमेदवार आहेत, त्यापैकी दुसरा किंवा तिसराही रन आऊट होऊ शकतो. रन आऊट कोणी होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं रोहित पवार म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार आहेत, तसेच ते अपक्षांसोबत संवाद साधणार आहेत. 

राष्ट्रवादी-काँग्रेस मध्ये मतांसाठी चढाओढ?
या निवडणुकीमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीकडून छोट्या पक्षांची मते पदरात आपल्या पाडून घेण्यासाठी छोट्या पक्षांना फोन केलं जात आहे. काँग्रेस पक्षाची समाजवादी पक्षासोबत मतांसाठी तीन वेळा बैठक पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून मतं देण्यासाठी सातत्याने फोन येत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. समाजवादी पक्षासमोरं नेमकं कुणाला मत द्यावं याबाबात संभ्रम असल्याचंही समजतंय. मात्र यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
Embed widget