Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Chitra Wagh on Supriya Sule : आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचे चित्र पाहायला मिळायचे ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती वाटत असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते.
Chitra Wagh on Supriya Sule : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांची हत्या, तसेच परभणीत झालेला हिंसाचार (Parbhani Violence) व न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार हल्लाबोल केला. आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचे चित्र पाहायला मिळायचे ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती मला वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
चित्रा वाघ 'एक्स'वर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, ओ मोठ्ठ्या ताई... बीड परभणीमध्ये घडलेल्या घटना नक्कीच दुर्दैवी आहेत. पण, त्या घटनांची न्यायालयीन चौकशी होणार आहे. गुन्हेगारांना इथे माफी मिळत नाही की पाठीशी सुद्धा घातलं जातं नाही. कारण दुर्दैवी घटना घडल्या की गुन्हेगाराला पाठीशी घालायचं हे तुमच्या वेळी सर्रास चालायचं. गोवारी हत्याकांड विसरलात का? गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा नादात मुंबईतील 13 वा कथित बॉम्ब ब्लास्ट…? लिस्ट करायची झाली तर ती वाढत जाईल... मोठ्ठ्या ताई लक्षात ठेवा महाराष्ट्र आमच्या देवाभाऊंच्या सुरक्षित हातात आहे. आता तुमचं जातीवाद आणि प्रांतवादाचे राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही, कारण जनता जनार्दनाला समजलं आहे की, एक है तो सेफ है, असा हल्लाबोल त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलाय.
ओ मोठ्ठ्या ताई... @supriya_sule
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 24, 2024
बीड परभणी मध्ये घडलेल्या घटना नक्कीच दुर्दैवी आहेत, पण त्या घटनांची न्यायालयीन चौकशी होणार आहे. गुन्हेगारांना इथे माफी मिळत नाही की पाठीशी सुद्धा घातलं जातं नाही. कारण दुर्दैवी घटना घडल्या की गुन्हेगाराला पाठीशी घालायचं हे तुमच्या वेळी सर्रास…
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. अर्थात या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते, लोक गेले तोपर्यंत कुणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते. मात्र फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्यामुळे कोण आहे हे शोधले पाहिजे. बीड आणि परभणीत ज्या घटना झाल्या, त्यावर विश्वास बसत नाही. जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळतंय. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल मला भीती वाटते, मला कधीही भीती वाटली नाही पण आता वाटते, असे त्यांनी म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी महाराष्ट्रला न्याय द्यावा, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
आणखी वाचा
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार