अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, OBC समाज माफ करणार नाही, भुजबळांच्या समर्थकांची नाशिकमध्ये बॅनरबाजी
छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे. भुजबळ समर्थकांकडून थेट अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी विश्वासघात केल्याचा बॅनर घेऊन समर्थक मेळाव्यासाठी दाखल झालेत.
Chhagan Bhujbal : मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावल्यानं आले आहे. त्यामुळं भुजबळ नाराज आहेत. मंत्रीमंडळात समावेश न केल्यानं भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या घटनेवरुन भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तसेच ठिकठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निदर्शने देखील केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे. भुजबळ समर्थकांकडून थेट अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी विश्वासघात केल्याचा बॅनर घेऊन समर्थक मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.
ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही, भुजबळाच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी
अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला आहे. संपूर्ण ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही असा बॅनरवर आशय आहे. समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये येणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून थेट राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांना मंत्रीमपद मिळायला हवं होतं, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांना मंत्रीपद नाकारल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भुजबळांनी देखील इशारा दिला आहे. त्यामुळं आता भुजबळ पुढच्या काळात नेमकी काय भूमिका घेमार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
भुजबळ भाजपसोबत गेले तरी आम्ही तयार
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि नाराज असलेले छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये समता परिषदेचा राज्य मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी समता परिषदेचे संस्थापक पदाधिकारी मुस्लिम संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी हे उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला आहे. त्यांना मानाचे स्थान मिळावं असे शब्बीर अन्सारी म्हणाले. ते भाजपसोबत गेले तरी आम्ही तयार आहोत. आज जो निर्णय होईल तीच पुढची दिशा असेल असेही शब्बीर अन्सारी म्हणाले. मात्र, समता परिषदेचे संस्थापक पदाधिकारी भुजबळांचे निकटवर्तीय मुस्लिम ओबीसी सेलचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी छगन भुजबळ भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही तयार आहोत अशी भावना व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळ विविध राजकीय चर्चा सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या: