एक्स्प्लोर

Manoj Jarange : छगन भुजबळ म्हणाले, अंतरवालीत दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी हा निघून गेला, आता मनोज जरांगे म्हणाले, चमत्कारी बाबा

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal, बीड : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली. त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले. एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला", असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, आलाच का ते कुठे गेलता काय माहित, तो महात्मा पाहिजे होता एखादा,चमत्कारी बाबा आहे तो. छगन भुजबळांना वेड लागलय. त्यांना आरोप करण्यापलिकडे काय करता येत नाही. आरोप करतोय तर सिद्ध करा. देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्यामागे आहे. त्याच आम्ही आता काही मनावर घेत नाहीत. छगन भुजबळला गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये दंगली घडवायच्या आहेत. सध्या देवेंद्र फडणवीसचे आमदार म्हणत आहेत, सध्या मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे. यांना शिक्कामोर्तब केलाय, दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत. 

भुजबळला गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये याला दंगली घडवायच्या आहेत

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ महापापी माणूस आहे. गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये याला दंगली घडवायच्या आहेत. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्या आंदोलनापुढे आंदोलन आणून बसवणार आहेत. हे महापाप या वयात तो करायला लागलाय. आपण किती ज्येष्ठ आहोत, पक्षात किती मोठे आहोत. आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणाने केली पाहिजे. हे त्याच्या लक्षात नाही, त्याला फक्त दंगली घडवायच्या आहेत. सरकार तुझ्याकडे तू चौकशी कर. मी असं म्हणालो तर तूच माघारी आणलं आणि मला बसवलं, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. 

छगन भुजबळ काय काय म्हणाले होते?

ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये  दगडफेक झाली लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे  तिथून निघून गेला. त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदारांनी त्याला तिथे परत आणून बसवलं. पवार साहेबांना तिथे बोलावलं पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी माहिती जी आहे त्या दोघांना कल्पना नव्हती. पवार साहेबांना पण आणि उद्धव ठाकरेंना पण इथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. महिला पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले. हे दोन्ही नेते गेल्यामुळे एकच बाजू जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जरांगेंना मिळाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget