एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal OBC Reservation : एकीकडे जरांगेंचं उपोषण, दुसरीकडे छगन भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; राज्यातील ओबीसी नेत्यांची तातडीने बैठक बोलावली!

Chhagan Bhujbal OBC Reservation : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहेत.

Chhagan Bhujbal OBC Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, “आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही,” अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यामुळे एकीकडे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ‘अ‍ॅक्शन मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे.  

मराठा आरक्षणावरून वाढत्या हालचालींचा ओघ पाहता, मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची उद्या (1 सप्टेंबर) मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम आणि मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची भूमिका याबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.  

उद्या ओबीसी नेत्यांची भव्य पत्रकार परिषद

बैठकीनंतर ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर होणार असून, विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट यासंदर्भात हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा संदर्भ देत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळ नेमके कोणते मुद्दे उपस्थित करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यातच आज रविवारी (दि. 31) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना टोकाचा निर्णय घेतला आहे. मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाणी पिणे मी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे. उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

आणखी वाचा 

'सरसकट' कुणबीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण; पण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे निकाल काय सांगतात?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार

व्हिडीओ

Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget