Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात गुन्हा दाखल; लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे 9 ऑक्टोबरला बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्यातील वक्तव्यावर फिर्यादी बिरादार यांनी आक्षेप घेतला आहे.

kadsiddheshwar maharaj: सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील बिळूरमध्ये प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी ता. बसवन बागेवाडी जि. विजयपूर) यांनी फिर्याद दिली आहे. धर्माच्या आरक्षणाच्या अनुषंगाने काडसिद्धेश्वर महाराज यांनी वक्तव्य केले होते. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवर कर्नाटक राज्यातील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो आज जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला .पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे 9 ऑक्टोबरला बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्यातील वक्तव्यावर फिर्यादी बिरादार यांनी आक्षेप घेतला आहे. द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने एकोप्याला धक्का आणणारे वक्तव्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या























