एक्स्प्लोर

Manoj Jarange : 'समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही', रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर मनोज जरांगेंचा निर्धार 

Manoj Jarange :

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) अनेक बांधवानी आत्महत्या केल्या असून मी दिवाळी (Diwali) साजरी करणार नाही. समाजाच्या अपेक्षांवर नांगर फिरला असून त्यामुळं ते दिवाळी करतील असे वाटत नाही. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्यांना विनंती आहे कार्यवाही करा, अन्यथा पुन्हा म्हणू नका मराठे आले म्हणून, मग ही धमकी समजा वा अजून काही समजा, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितलं आहे. मी कुटुंबियांसोबत बोललो नाही, कदाचित माझं कुटुंब ही दिवाळी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. मात्र दोन दिवसांच्या आरामानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचा (maharashtra Tour) दौरा सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे. 

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, आता व्यवस्थित वाटत आहे, म्हणून डिस्चार्ज मिळतो आहे. यानंतर लागलीच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेणार असून त्यानंतर 15 नोंव्हेबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहे. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असा दौरा असेल. 24 डिसेंबरपर्यत सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार असल्याचे सांगत सरकारवर दबावासाठी दौरा नाही, तर लोकांच्या भेटीगाठीसाठी असल्याचे स्पष्ट केले. सरकारकडून अनेक मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागली आहेत. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री, एसपी सगळ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर कार्यवाही करा, नाहीतर पुन्हा म्हणू नका मराठे आले. ही धमकी समजा वा अजून काही समजा, पण सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सांगातोय की गोरगरीब मराठ्यांना अत्याचार करू नका, अन्यथा मराठा समाजाशी गाठ आहे, असा इशाराच मनोज जरांगे यांनी नेते मंत्र्यांना दिला आहे. 

आत्महत्या करु नका, आरक्षण मिळेल....  

याचवेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील बांधवाना कळकळीचे आवाहन केले की, कुणीही आत्महत्या करू नका, आरक्षण आपल्याला मिळणार आहे. पायाला हाथ लावून सांगतोय, आत्महत्या करू नका. तसेच ओबीसी नेत्यांनी आता हट्टीपणा करू नये, वातावरण बिघडवू नये, राजकीय हट्ट सोडावा. ओबीसी नेत्यांकडून फार अपेक्षा नाही, ते आमच्याबाबत विचार करत नाही, असेही ते म्हणाले. तसेच ईडब्ल्यूएस म्हणजे जे वावर पिकत नाही ते आम्हाला देत आहेत, ते तुम्ही घ्या ना आणि इकडले आम्हाला द्या. या असल्या सल्ल्याना अर्थ नाही. दुसरीकडे गावबंदीचे पोस्टर काढले, म्हणून आमच्या पोरांना मारू नका, भोकरदनमध्ये दादागिरी सुरू असेल तर मराठे मोडून काढतील, ज्यांनी आमच्या पोरांना मारले त्यांच्यावर कारवाई करा, भोकरदन सहित सगळ्या नेत्यांना सांगतो, असा अप्रत्यक्ष इशारा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना दिला आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Manoj Jarange PC : राज्यातील राज घराण्यांकडे मनोज जरांगेंचं आवाहन, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget