रिक्षा चालवणारा आमच्यासमोर कोपऱ्यात बसायचा, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात
Chandrakant Khaire on Eknath Shinde, Chatrapati Sambhaji Nagar : ज्या पद्धतीने आमची संघटना फोडली, त्यामुळे आम्हाला दु:ख होतं. राग पण येतो. उद्धवसाहेब संयमी आहेत.
Chandrakant Khaire on Eknath Shinde, Chatrapati Sambhaji Nagar : "ज्या पद्धतीने आमची संघटना फोडली, त्यामुळे आम्हाला दु:ख होतं. राग पण येतो. उद्धवसाहेब संयमी आहेत. बोलू नका म्हटले. मी म्हटलं साहेब तसं नाही, आम्हाला खूप राग येतो. हे काहीही बोलतात. हे फक्त बडबड करतात. आपल्या साहेबांवर फक्त टीका करतात. काँग्रेसच्या काळात आम्ही विरोधात असताना देखील त्यांनी आमचे काम केलं. पुढे आमचं एनडीए चे सरकार आले. पण एकही काम त्यांच्या मंत्र्यांनी केले नाही. 4 तारखेनंतर आपलंच राज्य येणार आहे. हे बुटके ,बाटके, टकले काहीही बोलतात. गद्दारी केल्यावर या लोकांनी शिंदे यांना खुश करण्यासाठी झेंडे लावले", असे औरंगाबाद लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणाले. खैरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते आंबादास दानवेही उपस्थित होते.
रिक्षा चालवणारा आमच्या समोर कोपऱ्यात बसायचा
चंद्रकांत खैरे म्हणाले, कुठे होता शिंदे? रिक्षा चालवणारा आमच्यासमोर कोपऱ्यात बसायचा. दिघे साहेब गेल्यावर हा अचानक आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्याकडे कोणतेही खाते ठेवले नाही. सर्व खाते यांना दिले, पण यांनी समृद्धीच्या नावावर स्वतःची समृद्धी केली. सर्व काही लुबाडून घेऊन ते पैसे शिवसेना फोडण्यासाठी लावले. यांनी पन्नास खोके घेतले. पुढे बोलताना खैरे म्हणाले, संभाजीनगरला आपले 6 आमदार होते. भुमरे कसा माणूस आहे? दारुचे दुकाने आहे. 25 परवानग्या घेतल्या.12 दुकाने त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. मी असे काम केले नाही. त्यामुळे दारू वाले पाहिजे की सप्ताह वाले पाहिजे तुम्ही ठरवा.
देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार
आदित्य ठाकरे म्हणाले, देशभरात वातावरण पाहता 4 तारखेला देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. मिंधे सरकावाले येथे फिरतील. काही सरपंचांना धमकावले जात आहे. पराभव दिसायला लागल्यास भाजप हिंदू मुस्लिम वाद करतात. जिथे जिथे पराभव दिसायला लागला तिथे भाजप वेगवेगळ्या मार्गाने वाद निर्माण करतात. काही राज्यात अजूनही उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सर्वात विश्वासू चेहरा उद्धव ठाकरे आहेत.
महाराष्ट्रात जे काही झालं ते देवेंद्र यांनी केलं असेल, आपल्यातील डरपोक लोक पळाले. भाजपला एवढं काही करून काही मिळाले. मूळ भाजपचे लोक म्हणतात आम्हाला काहीच मिळाले नाही. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यात आले. भाजपवाले आपल्या डोक्यावर बसल्यास ते आपले सर्व उद्योग गुजरातला घेऊन जातील. आपलं मंत्रालय देखील गुजरातला घेऊन जातील.
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis on Shrirang Barne : श्रीरंग बारणेंना कोणत्या तालुक्यातून सर्वांत जास्त लीड मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी