(Source: Poll of Polls)
Devendra Fadnavis on Shrirang Barne : श्रीरंग बारणेंना कोणत्या तालुक्यातून सर्वांत जास्त लीड मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी
Devendra Fadnavis on Shrirang Barne, Maval Loksabha : लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Devendra Fadnavis on Shrirang Barne, Maval Loksabha : लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रत्येक पक्ष आमच्याच सर्वांत जास्त जागा निवडून येणार, असा दावा करताना दिसत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ लोकसभेचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळणार याबाबत भाष्य केलं आहे.
मावळमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने सामने आहे. उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. श्रीरंग बारणे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड पनवेल विधानसभामधून मिळणार आहे. ही देशाची निवडणूक आहे, महानगरपालिकेची नाही. त्यामुळे विकासपुरूष असलेल्या मोदींना निवडून द्या. महायुतीला विजयी करा. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 28 पक्षांची खिचडी तयार झाली आहे. महायुतीची गाडी ही विकासाचे मेट्रो आहे. याचे इंजिन मोदी आहेत. सर्व जातीच्या लोकांना गाडीत बसवून विकासाकडे जात आहेत. दुसरीकडे रेल्वे गाडीला फक्त इंजिन आहेत, डबे नाहीत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण गाडीचे इंजिन बनत आहे. त्यामुळे जो तो आपल्याला हवे त्या दिशेने इंजिन घेवून जाणार आहे.
ठाकरे, पवार, गांधींनी स्वत:च्या परिवाराची सोय केली
इंजिनमध्ये फक्त दोघांना बसायला जागा आहे. ठाकरे, पवार, गांधींनी स्वत:च्या परिवाराची सोय केली. मोदींनी 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. घरे दिली, गॅस दिला , मुद्रा लोन दिले. 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचे कर्ज मुद्रा लोनने दिले. यातील 31 कोटी महिला आहेत. बचत गटाचा मोठा सहभाग आहे. 10 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे काम मोदी करणार आहेत. महिलांना मुख्य धारेत आणले आहे. यापुढे 33 टक्के आमदार आणि खासदार महिला असतील. अनुसुचित जाती, अदिवासी समाज, 12 बलुतेदारांचा विचार केला. यासाठी 14 हजार कोटींची योजना आणली.
इतर महत्वाच्या बातम्या