जागावाटपाचं गणित ठरलं? भाजप किती जागांवर उमेदवार उभं करणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर
महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi) यांच्यात जागावाटपाच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र, महायुतीत भाजप किती जागा लढवणार याबाबची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Assembly Election Seats Allocation BJP : विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात देखील केलीय. तर इच्छुकांनी गाठी-भेटी, दौरे सुरु केले आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi) यांच्यात जागावाटपाच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र, महायुतीत भाजप किती जागा लढवणार याबाबची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जो पक्ष जी जागा जिंकू शकतो त्याने लढावी : सुधीर मुनगंटीवार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. मात्र, भाजपने 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं पेच निर्माण झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यांनी लढावी अशी भूमिका आमची असल्याचे ते म्हणाले. हट्टाने जागा घेणं व पुढे ती जागा पराभूत होणं, हे होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करुन तोडगा काढत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
शरद पवारांनी झेडप्लस सुरक्षा नाकारली, त्यांच्या जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार राहणार नाही : मुनगंटीवार
शरद पवार यांनी झेडप्लस सुरक्षा नाकारली आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या जीवाला पुढे काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. झेड प्लस सुरक्षेतून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार असे शरद पवार यांना वाटत आहे. पण हा त्यांच्या नेरेटिव्हचा भाग असू शकतो असे देखील मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: