एक्स्प्लोर

Chitra Wagh: मराठी माणसाला डावलल्याने रेणुका शहाणेंनी आवाज उठवला, भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या, तुमचं टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते

Marathi Vs Gujarati: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत मराठी माणसांसोबत दुजाभाव होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मराठी मनात संतापाची लाट उसळली होती. या सगळ्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी भाष्य केले होते.

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाला डावलणाऱ्यांना मत देऊ नका, असे आवाहन केले होते. मराठी "not welcome" म्हणणार्‍या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असे रेणुका शहाणे यांनी म्हटले होते. रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती. या सगळ्या वादात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी रेणुका शहाणे यांना जाहीर पत्र लिहून काही सवाल विचारले आहेत.

चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांच्या भूमिकेचे कौतुक केले असले तरी त्यांनी हा मुद्दा आता उचलून धरण्याच्या टायमिंगवर चित्रा वाघ यांनी शंका व्यक्त केली आहे. यामागे राजकीय हेतू तर नाही ना?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहलेले हे जाहीर पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

मा.रेणुकाताई शहाणे, 

जय महाराष्ट्र  आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा,परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे.

भारतीय  विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. 

आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. 

पण मी आपणास विचारू इच्छिते की, आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वत: खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. 

मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. 

आपणास एक प्रश्न विचारते की  कोविडमधे पिपिई किट्स,बॉडी बॅग्स,मास्क,औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. 

अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का?

आणखी वाचा

मराठी "Not Welcome" म्हणणार्‍या...घरं नाकारणाऱ्यांना...; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्री रेणुका शहाणेची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget