एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका

Ajit Pawar NCP Lok Sabha Result  2024: अजित पवारांनी काकांच्या विरोधात बंडखोरी तर केली, पण ही बंडखोरी मतदारांच्या पसंतीस उतरली नसल्याचं दिसतंय. 

Ajit Pawar NCP Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या चार पैकी तीन उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अजित पवारांना आपल्या बालेकिल्ल्यात देखील झेंडा रोवता आलेला नाही. मागच्या निवडणुकीमध्ये मुलाला उभं केलं, पण तो  हरला आणि आणि आता पत्नी देखील पराभूत झाली. त्यामुळे या पराभवाचा राष्ट्रवादीला मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय. अजितदादांना बंडखोरी तर नडली नाही ना? असा गंभीर प्रश्न देखील उपस्थित होतोय. 

जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 4 जागा आल्या होत्या. बारामती, शिरुर, धाराशिव आणि रायगड. रायगडची जागा वगळता इतर तिन्ही जागांवर दादांचे उमेदवार पराभूत झाले. या चारही जागांचा सखोल आढावा घेऊयात.

बारामती लोकसभा मतदारसंघ  

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी अशी लढत झाली. दोन्ही उमेदवार पवार घराण्यातील सदस्य. नणंद विरुद्ध भावजय अशी अटतटीची लढत झाली. या आरपारच्या लढाईत सुनेत्रा पवारांचा 1 लाख 58 हजार 333 मताधिक्याने पराभव झाला. तर खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यांना  7 लाख 32 हजार 312 मतं मिळाली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केलं, ठिकठिकाणी सभा घेतल्या, गाव न गाव पिंजून काढलं. पण यश मात्र त्यांच्या पदरी पडलं नाही.    

शिरुर लोकसभा मतदारसंघ 

या मतदारसंघात देखील पवार काका विरुद्ध पुतण्या असा जंगी सामना पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.पण हा निर्णय दादांना रुचला नाही. म्हणून दादांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं. कोल्हेंना जमेल तितका विरोध केला, त्यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेनेतून तिकीट न मिळाल्यानं शिवाजी आढळरावांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले. 2019 साली अजितदादांनी कोल्हेंना प्रथम संधी दिली. तेव्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा सामना झाला होता. मागच्या वेळी ज्यांचा विरोध केला त्यांचाच घडाळ्याच्या चिन्हावर लढायला लावलं आणि त्याचा प्रचार केला. विशेष म्हणजे अमोल कोल्हे दोन्ही वेळेस भरघोस मतांनी निवडून आले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघ 

ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्या चुरशीची लढत झाली. ओमराजे शिवसेना ठाकरे पक्षाकडून लढले तर अर्चना पाटील या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून लढल्या. ओमराजेंनी तब्बल तीन लाख 29 हजार 846 मतांनी पराभव केला आहे. तर ओम राजेनिंबाळकर यांना सात लाख 48 हजार 752 मतं मिळाली. ओमराजेंच्या विजयाने ठाकरेंना नवी उभारी मिळाली आहे.

बारामती, शिरुर आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला अपयश आलं. मात्र रायगडची काबीज करण्यात यश आलं.

रायगड लोकसभा मतदारसंघ 

रायगडमध्ये अनंत गिते विरुद्ध सुनील तटकरे असा चुरशीचा सामना रंगला. उद्धव ठाकरे पक्षाकडून अनंत गिते लढले तर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून सुनील तटकरे मैदानात होते. 5 लाख 8 हजार 352 मतं घेऊन सुनील तटकरे विजयी झाले. 82 हजार 784 मतांनी अनंत गितेंचा दारुण पराभव झाला. गितेंच्या पराभावने ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. सुनील तटकरे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे तटकरेंच्या विजयाने थोडासा का होईना अजितदादांना दिलासा मिळालाय.

मागील वर्षाभरात हादरवून टाकणाऱ्या राजकीय घटना घडल्या. दादांची बंडखोरी, शरद पवारांविरोधात केलेली भाषा मतदारांना रुचलेली दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. प्रचारात संपू्र्ण महाराष्ट्र पिंजून काढला, पण यश मात्र आलं नाही. त्यामुळे विधानसभेला दादांच्या पदरी काय येतं हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची  मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ramdas Kadam On BJP :  100 + जागा द्या नाहीतर सर्व 288 जागा लढवू- रामदास कदमMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : ABP Majha : 6 PMTOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 20 June 2024 : ABP MajhaRamdas Kadam On Ajit Pawar : रामदास कदमांची स्फोटक मुलाखत;जागा वाटप ते निकाल,दादा-फडणवीस निशाण्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची  मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
Nashik Crime : नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
'मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न', संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारकरी संतापले; म्हणाले...
'मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न', संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारकरी संतापले; म्हणाले...
Embed widget