एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav : हिवाळी अधिवेशनाला न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा? भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

Bhaskar Jadhav: सत्ताधाऱ्यांच्या 293च्या प्रस्तावावर 86 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र प्रत्यक्षात 86 पैकी 17 आमदार अद्याप अधिवेशनाला आले नसल्याची गंभीर बाब भास्कर जाधव यांच्याकडून उघड करण्यात आलीय.

Bhaskar Jadhav नागपूर : सत्ताधाऱ्यांच्या 293च्या प्रस्तावावर 86 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र प्रत्यक्षात 86 पैकी 17 आमदार अद्याप अधिवेशनाला आले नसल्याची गंभीर बाब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याकडून उघड करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाला न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा? असा सवाल करत विधानसभा अध्यक्षांनी याचे उत्तर द्यावं, अशी मागणी ही भास्कर जाधव यांनी केली आहे. 

मी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांनी याला विरोध केला. मात्र मी हजेरीपट काढून 17 सदस्य हे अधिवेशनाला अनुपस्थित राहून सुद्धा प्रस्तावावर सह्या झाल्याच सिद्ध केल असल्याचे ही भास्कर जाधव म्हणाले. तर सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावावर बनावट सह्या केल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. या सह्या प्रस्तावावर जर आमदार उपस्थित नसतील तर कोणी केल्या? हे समोर आणावं. अशी मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. 

मी अजित पवारांना खोगोची गोळी देणार- भास्कर जाधव 

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दोन दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गायब असल्याची चर्च रंगत होती. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार अनुपस्थितीत राहिले. घशाला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मात्र छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अजित पवारांनी माध्यमांपासून दूर राहणं पसंत केल्याची देखील राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अजित पवार आज हिवाळी अधिवेशनात  सहभागी झाले आहे. यावरुनच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित दादा यांचा घसा खराब असल्याने मी त्यांना खोगोची गोळी देणार आहे, ती अजित पवारांनी घशात ठेवावी, असा मिश्किल टोला भास्कर जाधव यांनी लगावला. 

शिवसेनेला गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण खातं-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget