गुहागरमध्ये सगळं ठीक, पण आता मी चिपळूणमधून उभा राहणार, भास्कर जाधवांकडून मतदारसंघ बदलण्याचे संकेत
Bhaskar Jadhav on Assembly Election : "गुहागरमध्ये (Guhagar) सगळं ठीक आहे. पण मी आता चिपळूणमध्ये उभा राहणार आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये तुम्ही माझा प्रचार करा.
Bhaskar Jadhav on Assembly Election : "गुहागरमध्ये (Guhagar) सगळं ठीक आहे. पण मी आता चिपळूणमध्ये उभा राहणार आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये तुम्ही माझा प्रचार करा. विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर (Chiplun) मतदारसंघाची जागा लढवणार आहे", असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले आहेत. लोकसभेचा प्रचार करत असतानाच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Election) भाष्य केलं आहे. 2019 मध्ये ज्या मतदारसंघातून निवडून आले तो मतदारसंघ सोडून चिपळूणमध्ये शिफ्ट होण्याचा भास्कर जाधवांचा प्लॅन आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेची फिल्डिंग
लोकसभेच्या प्रचार सभेदरम्यान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना चिपळूणमध्ये प्रचारासाठी येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा चिपळूण संगमेश्वर मतदार संघावर दावा केला आहे. सध्या चिपळूणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. त्यातच आता भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) चिपळूणमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव नरमले
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) लोकसभा निवडणुकीत आक्रमक होऊन प्रचार करतील अशा चर्चा होत्या. ते सध्या ठाकरे गटांच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावत आहेत. प्रचारही जोरदार करत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे आक्रमकपणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) दाखवलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी राणे पिता-पुत्र आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र, त्यानंतर भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांनी समजदारी दाखवून वादावर पडदा टाकलाय.
भास्कर जाधव सध्या गुहागरचे आमदार
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) सध्या गुहागरचे आमदार आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी ही निवडणूक राष्ट्रवादीच्या बेटकर देवजी यांच्याविरोधात लढली होती. भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) 78 हजार मत मिळवून 55 टक्के मत मिळवली होती. मात्र, आता भास्कर जाधव कोणत्या कारणामुळे मतदारसंघ बदलणार आहेत, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या