एक्स्प्लोर

Baramati Lok Sabha Election: कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार? 1967 सालापासून पवार कुटुंबाची परंपरा, 57 वर्षात कधीच पडला नाही खंड

Baramati Lok Sabha Election: आज सुप्रिया सुळे यांचा तर उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार  सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात सकाळी साडे नऊ वाजता प्रचाराचा  असून शुभारंभ होणार आहे. त्यांना नंतर जाहीर सभा होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत. शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आज सुप्रिया सुळे यांचा तर उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही आपल्या श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन केले नाही. पवार यांनी आपल्या धार्मिक आस्था या नेहमीच सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवल्यात. त्यामुळे शरद पवार हे नास्तिक की आस्तिक अशी कधीतरी चर्चा होत असते. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे पुजारी महादेव शिंदे यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. पवार कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे कन्हेरी येथील मारुती मंदिरावर श्रद्धा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

57 वर्षापासून आजपर्यंत परंपरा कायम

या मंदिरातूनच प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. केवळ निवडणुकीपुरतं पवार कुटुंब या मंदिरात येतं नाही. अनेकदा सवड मिळेल तेव्हा पवार कुटुंबीय या मारुती मंदिरात येतात अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली. शरद पवार यांनी 1967 साली पहिली  आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. छोटी असो किंवा मोठी  येथे नारळ फोडूनच प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. आजही परंपरा आजही जपली गेली आहे. यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिली निवडणूक आहे. नणंद - भावजय यांच्यात जरी ही लढत असली तरी   बारामती काकांची की पुतण्याची याचा फैसला होणार आहे. 

हे ही वाचा :

Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special ReportTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde Full PC : सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget