एक्स्प्लोर

Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...

Ajit Pawar: निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात  यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले, असं अजित पवार म्हणाले.

पुणे : बारामतीमधील (Baramati Lok Sabha Election) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. दोघांनी दगडूशेठ गणपतीचं आरती देखील केली. मोठा विजय होऊ दे, यासाठी गणरायाकडे साकडं घातलं, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. तर निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात  यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले, असं अजित पवार म्हणाले. गणरायाने मला भरपूर दिले आहे. सगळ्यांचे भलं कर, असे देखील अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, चांगल्या वातावरणात पार पडाव्यात त्याकरता गणरायाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा मोदी बसत असताना महाराष्ट्राचा त्यामध्ये मोठा वाटा पाहिजे. महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदावर लोकसभेला जास्तीत जास्त निवडून यावेत, अशी प्रार्थना देवाला केली आहे. आशिर्वाद घेतला असला तरी प्रत्येकाला काम करावे लागते, फिरावे लागते. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. प्रत्येक पक्ष जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करतील. शेवटी जनता जनार्दन श्रेष्ठ आहे. जनता जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल.

जिथे महायुतीचे उमेदवार आहे तिथे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री जाणार 

पुण्यातील आज अर्ज आणि शक्तिप्रदर्शनाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले,   शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जायचे असे आम्ही ठरवले आहे.  पुण्यात अर्ज भरल्यानंतर सातारा, सांगलीला जाणार आहे.  फॉर्म भरला जाईल त्यानंतर सभा होईल. 

रात्री उशीरापर्यंत बैठक : अजित पवार

पुण्यातील विमान नगर परिसरातील हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात झाली बैठक. भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे ताकदीने काम करण्याचं आव्हान केल्याची माहिती आहे. या विषयी बोलताना अजित पवार म्हणाले,  रात्री उशीरापर्यंत बैठक झाली.  भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून काही चर्चा केल्यात.

ध चा म करु नका : अजित पवार

कालच्या ईव्हीएमच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ध चा म करु नका. ती जाहीर सभा नव्हती. जाहीरनाम्यात पण काय करणार सांगितले जाते याचा अर्थ प्रलोभन दाखवले असे म्हणता येणार नाही. मी नेहमी आचारसंहितेमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेत असतो. उगाच कशाचाही बाऊ करु नका. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर मी वक्तव्य केले. फक्त मी थोडं ग्रामीण शैलीत वक्तव्य केले. 

हे ही वाचा :

Loksabha Election 2024 : पुण्यात उद्या राजकीय रणधुमाळी; 'बारामती'साठी पवार विरुद्ध पवार संघर्षाला धार येणार 



आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Rajyasbha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
Aditya Thackeray On Raj Thackeray And Eknath Shinde Meet: पहिले काकांना भेटले, मग पत्रकारांशी बोलले; एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर प्रश्न विचारताच आदित्य ठाकरेंनी काय केले?, VIDEO
पहिले काकांना भेटले, मग पत्रकारांशी बोलले; एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर प्रश्न विचारताच आदित्य ठाकरेंनी काय केले?, VIDEO
Tejas Thackeray: तेजस ठाकरेंना आठवडाभराच्या उपचारानंतर रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज; ‘मातोश्री’वर परतले
तेजस ठाकरेंना आठवडाभराच्या उपचारानंतर रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज; ‘मातोश्री’वर परतले

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajyasbha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
Nashik News: दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Epstein Files: व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Gold Silver Rates Today: सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Embed widget