Ashish Shelar : 'मुख्यमंत्रिपदाबाबत उबाठाचे तारे जमीन पर'; आशिष शेलारांचा घणाघात, शरद पवारांनाही डिवचलं
Ashish Shelar on Uddhav Thackeray and Sharad Pawar : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. यावरून आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Ashish Shelar on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात बोलताना निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा. शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा.कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार असल्याचे वक्तव्य केले. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले की, उद्धवजी सत्य बोलले की ज्याचे आमदार जास्त आहेत. त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला होता. उद्धवजी ज्या कपोलकल्पित भूमिकेवर मुख्यमंत्री पद मागत होते त्यावर त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्रिपदाबाबत उबाठाचे तारे जमीन पर हे आजच्या मेळाव्यातून दिसून आले आहे, असे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंचा पक्ष गद्दार शिरोमणी
ते पुढे म्हणाले की, बैठक करूनही दिल्लीला जाऊनही मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून त्यांनी हे विधान केलंय. हे भांडण लाथा बुक्क्यांवर जाऊ नये. आपल्या समोरील पक्षाला आव्हान देताना स्वपक्षीयांना बळ दिले पाहिजे यासाठी ते भूमिका मांडतायत. महाराष्ट्र द्रोहींना रोखण्याचं काम आम्ही करत आहोत. ते मुख्यमंत्री असताना महिलांवर अत्याचार झाले. महाराष्ट्र हिताच्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला म्हणून ते महाराष्ट्र द्रोही आहेत. महाराष्ट्र द्रोहींना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष गद्दार शिरोमणी आहे. महाराष्ट्राच्या मतदारांशी तुम्ही गद्दारी केली, तुम्ही इतरांकडे बोट दाखवू नका, अशी टीका त्यांनी केली.
पवार साहेब या वयात खोटं बोलणं शोभत नाही
शरद पवार यांनी भाषणात संविधानावरील संकट अजूनही गेलेलं नाही, अशी टीका केली. यावर आशिष शेलार म्हणाले की, पवार साहेब या वयात खोटं बोलणं शोभत नाही. शरद पवारांचे विधान धादांत खोटं आहे. काँग्रेसने घटनेत सर्वाधिक बदल केले आहेत. पवार साहेब, उघडा डोळे बघा नीट. पंतप्रधानांनी कायद्यात सबळता दिली आहे. पवार साहेब असत्य पसरविण्याचा प्रयत्न करू नका. देशाच्या व्यवस्थांमध्ये अनारकी निर्माण करणे, आरबीआयपासून न्यायालयापर्यंत वातावरण निर्माण करणे यातून लोकशाहीबद्दल अनास्था निर्माण केली जातेय, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा