एक्स्प्लोर

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे, नसीम खान वर्षा गायकवाडांनी मानले आभार

महाविकासआघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर  निशाणा साधला आहे. महामेळाव्यात कोण काय म्हणाले हे जाणून घेऊया...

मुंबई :  महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi)  मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, अशी घोषणा  उद्धव ठाकरेंनी केली आहे.   जागावाटपावरुन मारामाऱ्या नको अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे.  तसेच   सेक्युलर सिव्हील कोड म्हणजे मोदींनी हिंदूत्व सोडलं का? असा सवाल मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा मोदींना  केला आहे.  सरकार निवडणुकांना घाबरले आहे.  असे जयंत पाटील म्हणाले. महाविकासआघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर  निशाणा साधला आहे.महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. खासदार सुप्रिया सुळे, खासदार वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक केलंय,   महामेळाव्यात कोण काय म्हणाले हे जाणून घेऊया...

उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray Full Speech) 

निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे .  त्यांनी महाराष्ट्रची निवडणूक सुद्धा आज जाहीर करावी. महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे.  लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे... सत्ताधारी बघतायत डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो.  मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा आहे.

भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला नको आहे.  ज्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा ठरवलं जायचं.  पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या पण यामध्ये असा नको  आधी ठरवा आणि मग पुढे जा कारण त्यामध्ये धोका जास्त आहे. योजना पोहचवणाऱ्याला 10 हजार महिना दिला जातोय त्यासाठी दूत नेमले.  हा लोकांचा पैसा आहे, अशा योजनामध्ये राज्याची लूट हे करत आहेत. आपण नाही होऊ शकणार दूत आपण अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहचवा, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहेत.  

विधानसभा निवडणूक एक महिना पुढे ढकलयच सुरु आहे . कारण आपलं काम जनतेने विसरायला पाहिजे . लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे?  IAS अधिकारी सांगतंय साहेब तुम्ही लवकर या.. यांचा खरं रूप काय? गद्दार.. सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत आहेत, असे म्हणत लाडक्या बहीण योजनेवर टीका केली आहे.

सुप्रीम कोर्टात पक्षाची लढाई सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले,  या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आपल्याला न्याय देवतेचा आशीर्वाद मिळेल. आपला निकाल 50 वर्षात नक्कीच लागेल.  चंद्रचूड यांचा भाषण मी ऐकलं नाही. भूतकाळात जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा राम शास्त्री प्रभुणे आठवतात . चंद्रचूड साहेब तुम्ही जे काय केलं आहे त्याची सुद्धा नोंद भूतकाळात होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.   मोदींची गॅरेंटी चालत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी जर हे प्रश्न विचारात असाल तर आजच निवडणूक जाहीर करा. तुम्ही राज्यात ओबीसी मराठा वाद लावलाय.. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ.. समाजासमाजात आगी लावू नका, असे आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केले आहे.

जयंत पाटील काय म्हणाले? (Jayant Patil Full Speech) 

लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, महाराष्ट्रमध्ये 31  जागामध्ये भाजपला नाकारलेला आहे.  ते घाबरलेले आहे आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो.  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये सही करण्यावरून काहीतरी झालं. ते म्हणताय आतापर्यंत आम्ही बघून सह्या केल्या का? म्हणजे आतापर्यंत न बघता सह्या केल्या आहेत . शरद पवार म्हणतात जो प्रमुख असतो तोचं आधी बोलतो, अशी दक्षिणेकडची पद्धत आहे , असेही जयंत पाटील म्हणाले. 

सरकार निवडणुका कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता.  आज सुद्धा हरियाणा जम्मू काश्मीर निवडणूक जाहीर होतीये अशी माहिती आहे.   महाराष्ट्र सरकार अजूनही निवडणूक घ्यायला घाबरत आहे.  15  ते 20  नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घेतील.  कारण हे अजूनही घाबरले आहेत. 400  पार करणारे 240 वर थांबले आणि नंतर पलटी मारणारे दोन टेकू सोबत घेतले . सिव्हिल कोडमध्ये सेक्युलर शब्द तुम्हाला वापरावा लागला यात तुमची हार आहे . तुम्ही एक दिलाने जर महाविकास आघाडीमध्ये काम केलं तर आपलंच सरकार राज्यात येईल ही काळ्या दगड्यावरची रेष आहे.

हिंदू संस्थानाच्या जमिनी लाटल्या गेल्या या जमिनी भाजप नेत्यांना विकल्या गेल्या. या जमिनी वर्ग 2 च्या वर्ग 1 मध्ये घेण्याबाबत कॅबिनेट निर्णय घेतला. 6 हजार किमी रस्ते सिमेंट काँक्ट्रिट करणार आहे. MSIDC मंडळवर ही जबाबदारी दिली. स्टाफ त्यांच्याकडे नाही आणि 37000 कोटींचा काम हे मंडळ करणार आहे.  नांदेडहून जालना कडे जाणारा रस्ता करत आहेत. 1  किमी साठी 83  कोटी रुपये  खर्च येतोय. 96  किमीचा मार्ग करत आहेत.  अलिबाग वर्सोवा कॉरीडोर करताय. 20 हजार कोटी पेक्षा जास्त खर्च यासाठी करत आहेत. चंद्रावर जायला सुद्धा एवढा खर्च येत नाही. भाई ठाकूरकडे जायला एवढा खर्च करतय 

लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, महाराष्ट्रामध्ये 31 जागामध्ये भाजपला नाकारलेला आहे.  ते घाबरलेले आहे, आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो.   मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मध्ये सही करण्यावरून काहीतरी झालं  ते म्हणत आहे.  आतापर्यंत आम्ही बघून सह्या केल्या का? म्हणजे आतापर्यंत न बघता सह्या केल्या आहेत . शरद पवार म्हणतात जो प्रमुख असतो तोचं आधी बोलतो, अशी दक्षिणेकडची पद्धत आहे. 

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? (Supriya Sule Full Speech )

बहिणीचा नातं आमच्या भावाला कळलंचं नाही हो! प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही... प्रेमात आणि व्यवसाय मध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचा नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही हो... यांचा नातं फक्त मताशी जोडलेला आहे, एकातरी लाडक्या बहिणीचे पैसे परत घेऊन बघा!  गलिच्छ राजकारणात नातं येईल असा कधी वाटलं नव्हतं , असे सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

शहाण्यानी कोर्टाची पायरी कधीच चढू नका... ही लढाई मशाल किंवा तुतारीची नाही तर तत्वाची लढाई आहे.  उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तर अधिकारी आहे .  तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दुखविण्याचा काम या लोकांनी केलं आहे.   उद्धवजी बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते, सर्वोच्च न्यायलायची लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही.  उद्धवजी प्रेमाच नातं कधीही तुटणार नाही.. सेना ही कधीही वेगळी आहे हे असे वाटलं नाही... खेळीमेळीच्या वातावरण मध्ये काम केलं... आपण प्रयत्नशी पराकष्टा करू पण सरकार आपलं आणू .

 वर्षा गायकवाड काय म्हणाल्या? (Varsha Gaikwad Full Speech) 

सुप्रिया ताई खरचं म्हणाल्या की मुख्यमंत्री हा घरचा माणूसही होऊ शकतो हे मला उद्धवजींसोबत काम केल्यावर कळले. सगळ्या मंडळींच्या तालमीत घडलो आहे.  सुप्रिया सुळेनी सांगितले की केंद्रातले वातावरण बदललेले आहे कारण तिकडे ढगाळ वातावरण आहे. पहिले मोदी सरकार सांगायचे आता एनडीए सरकार म्हणतात. लेक लाडकी योजनेवर बोलत असतात. महालक्ष्मी योजना पहिली तेलंगणा आणि कर्नाटक सरकारने आणली  आहे.  वर्षाला 1 लाख रुपये देणार अस सांगितले होते 

बहिणीचा सन्मान झाला पाहिजे हे सत्य आहे . भाऊ आता घाबरलेत बारामतीमधून लढण्याची इच्छा नाही असे म्हणत आहेत हीच मोठी ताकद आहे .  तुम्ही बहिणीसाठी  नाहीतर मतासाठी काम करताय. मत दिले नाहीतर पैसे परत घेऊ म्हणतात हा पार्टी फंड नाही तर जनतेच्या घामाचा पैसे आहे .  प्रत्येकजण उठतो आणि धमकी देत आहेत . हा पैसा राज्याचा आहे जनतेचा आहे तो गेला पाहिजे. 600 रुपयाचा कुकर अडीच हजार रुपयाला चालला आहे . लाडकी बहीण आज झाले लाडका मित्र वर्षभरापासून सुरू आहे .

बाळासाहेब थोरात काय म्हणाले? (Balasaheb Thorat Full Speech)

दोन महिने कशी झोडाझोडी करायची याची रंगीत तालीम आज सुरू झाली आहे. आम्ही महाराष्ट्र फिरतोय महाविकास आघाडी सरकारचा विजय होणारं आहे हे स्पष्ट आहे. लोकशाहीवर आघात होतो त्यावेळी महारष्ट्र पेटून उठतो हे दाखवुन देण्याचं काम आपण केलं आहे . सगळ्या सत्ता यांनी गुलाम केल्या आहेत. भाजपने 10 वर्ष ज्या प्रकारे काम केलं दबाव टाकला याला उत्तर महाराष्ट्राने दिलं आहे. आता आम्ही लोकसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून वाघणीनी पाठवल्या आहेत. राहुल गांधी यांनी भाषणं केलं त्यानंतर मोदींची 56 इंच छाती खाली आली आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

बाळासाहेब थोरात म्हणाले,  मोदींना आता सेक्युलर शब्द वापरावा लागला. आता घटनेवर बोलू लागले. धर्मनिरपेक्षता आपल्याला कळली आहे. हे देखील आपण भाजपला दाखवुन दिलं आहे.  घटनेवर लोकशाही वर आघात होण्याची शक्यता आहे कारण त्यांचा तोच उद्देश आहे. राज्यांत बेकायदेशीर सरकार डूबावण्यचा काम सरकारने हाती घेतलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
IND vs AUS : 224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने  सामने येणार
224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार
Afghanistan: तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
Diwali 2025 : होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Modern College: कॉलेजकडून आडकाठी, इंग्लंडमधील नोकरी गेली, काय आहे प्रकरण?
Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ? सत्ताधारीच आक्रमक, 48 तासांत दुबार नावं हटतील
Election Vote List Scam : आरोपांच्या फैरी चौकशीची तयारी, मतदार यादीत घोळ?
Maharashtra Politics: दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडणार, ठाण्यात ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार?
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
IND vs AUS : 224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने  सामने येणार
224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार
Afghanistan: तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
Diwali 2025 : होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
''पंडीत नथुराम गोडसेच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले, म्हणून एकनाथ शिंदेंसह आमचा डीएनए एकच''
''पंडीत नथुराम गोडसेच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले, म्हणून एकनाथ शिंदेंसह आमचा डीएनए एकच''
RBL Bank : मुंबईतील आरबीएल बँकेची विक्री होणार, दुबईतील समूह 26853 कोटी रुपयांची गुंतवणूक, 60 टक्के भागीदारी खरेदी करणार
आरबीएल बँकेची मालकी दुबईच्या कंपनीकडे जाणार, 26853 कोटी रुपयांची डील, 60 टक्के भागीदारी घेणार
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Embed widget