(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asaduddin Owaisi : पीएम मोदी, उद्धव ठाकरे जो कुर्ता घालतात,तो बाबराने भारतात आणला होता;असदुद्दीन ओवैसी यांचा दावा
Asaduddin Owaisi : "इथे किती लोक कुर्ता घालून आले आहेत. मोदीपण कुर्ता घालतात. उद्धव ठाकरे पण कुर्ता घालतात. इम्तियाज जलिल कुर्त्यामध्ये चांगले दिसतात. हा कुर्ता कुठून आला माहिती आहे का? हा कुर्ता बाबराने आणलेला आहे. कांदा सगळे खातात ते कोणी दिला. औरंगजेबाने दिला.
Asaduddin Owaisi : "इथे किती लोक कुर्ता घालून आले आहेत. मोदीपण कुर्ता घालतात. उद्धव ठाकरे पण कुर्ता घालतात. इम्तियाज जलिल कुर्त्यामध्ये चांगले दिसतात. हा कुर्ता कुठून आला माहिती आहे का? हा कुर्ता बाबराने आणलेला आहे. कांदा सगळे खातात ते कोणी दिला. औरंगजेबाने दिला. आता तुम्ही सांगत आहात की, देशात राहायचे असेल तर असे वागा. तुम्ही कुर्ता कशाला घालता. कुर्ता घालूच नका. आम्हाला मुघलांशी काही देणेघेणे नाही", असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. अकोला येथे एमआयएमची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
नारे तकबीर अल्लाहू-अकबरचे नारे
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, सारख म्हणतात मंदिरे तोडली. मंदिर कोणी तोडली माहिती आहेत का? जम्मू काश्मीरचा बादशहा होता राजा हर्ष..त्याच्याकडे एक फौज होती. त्याच काम एवढचं होतं की, मंदिर तोडा. मी भडकावू भाषण देत नाही. तुमच्या मनात बाबरी मशीदीबाबत आस्था आहे की नाही? असे म्हणत ओवीसींनी नारे तकबीर अल्लाहू-अकबरचे नारे दिले. हिटलरने 60 लाख यहूदींना संपवले. 1930 मध्ये हिटरलने हे कृत्य केलं. आता आपण 2024 मध्ये आलो आहोत. दरवर्षी यहुदी हा दिवस आठवतात. तर भारतातील मुस्लीमांनी 6 डिसेंबर हा दिवस लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही 6 डिसेंबर विसरु नका. तुम्ही 6 डिसेंबरला विसरलात तर तुमच्या आयुष्यात 6 डिसेंबरप्रमाणे घटना घडू नयेत.
काँग्रेसमध्ये काय राहिलं हे काँग्रेस वाल्यांनी सांगावे
महाराष्टात कोणीही सेक्युलर राहिलेले नाही. उद्धव ठाकरे म्हणतात, बाबरी पाडल्यामुळे आम्ही खूश आहोत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या कोण आहे? शरद पवार साहेब, काँग्रसचे नेते हे त्यांच्यासोबत आहेत. हीच काँग्रेस पुन्हा येऊन म्हणेल की, वाचवा. अरे तुम्ही आम्हाला म्हणत आहात. पंजाबमध्ये सिद्धू भाजपमध्ये जात आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलं हे काँग्रेस वाल्यांनी सांगावे. आता आपल्या देशात काय होत आहे. देशात मुस्लीमांसंबधीत ज्या गोष्टी आहेत, त्याला इथे ठेवले जाऊ शकत नाही, असं बोललं जाऊ लागलं आहे. आम्ही आणि मुगल एक असल्याचे सांगतात. मी काय औरंगजेबाचा प्रवक्ता आहे का? असा सवालही ओवेसी यांनी केला. अशोक चव्हाण भाजप-मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेत. माझ्यावर यांनी सातत्याने भाजपची बी टीम आहे, अशी टीका केली. मात्र, हेच आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, असे म्हणत ओवैसी यांनी अशोक चव्हाण आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या