एक्स्प्लोर

Asaduddin Owaisi: तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग; खा. ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलं

Asaduddin Owaisi: पाकिस्तान आपल्यापेक्षा अर्धी पिढी मागे आहे. तिथे ते साधी सुई ही बनवू शकत नाहीत. तुम्ही आमची एकी तोडू शकत नाही.  असेही खा. ओवैसी म्हणाले.

Pahalgam Terror Attack: काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे.पाकिस्तानची आर्थिक कोंडी करा. पाकिस्तानवर अशी कारवाई करा की पुन्हा एकाही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे.  तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला चांगलच ठणकावलं आहे. (Jammu & Kashmir)

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी   हल्ल्याचा खासदार ओवैसींनी तीव्र निषेध केलाय. दरम्यान, वक्फ बिलात झालेल्या बदलावरूनही ते बोललेत. आमच्या धार्मिक स्थळांच्या जमिनी घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा काळा कायदा आहे. आम्ही याला फाडतो. असेही ओवैसी म्हणालेत. परभणीत वक्फ कायद्यातील बदलाविरोधात (Parbhani) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात ते बोलत होते.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले," देशाच्या प्रमुखांना मी मागणी करतो की त्यांनी पाकिस्तानची कोंडी करावी. आमचा देशाच्या लष्कराचे जेवढे बजेट आहे तेवढे तुमच्या देशाचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत. काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे. काश्मिरी पण आमचेच आहेत. आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाहीत. काश्मिरी नागरिकांबद्दल द्वेष पेरला जातोय. मात्र आपल्याला एक राहावंच लागेल. पाकिस्तान आयएसआयएस, एलइटी यांना हेच पाहिजे आहे की भारतात हिंदू मुस्लिम भांडण लागली पाहिजेत. आम्हाला एक राहावंच लागेल. देशाने जी कारवाई करायची ती करावी. काश्मिरी नागरिकांबद्दल जो द्वेष पसरवला जातोय तो घातक आहे.  ते पुढे म्हणाले, तुम्ही पाकिस्तान वर अशी कारवाई करा की पुन्हा एकही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे. पाकिस्तान आपल्यापेक्षा अर्धी पिढी मागे आहे. तिथे ते साधी सुई ही बनवू शकत नाहीत. तुम्ही आमची एकी तोडू शकत नाही. असंही ते म्हणाले.

'..तुम्हाला वक्फ कायदा मागे घ्यावाच लागेल': असदुद्दीन ओवैसी 

आता देशाच्या अंतर्गत घडामोडींवर बोलतो असं म्हणत वक्फ बिलावर त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी जर जगात नाव करू इच्छितात तर तुम्हाला वकफ कायदा मागे घ्यावा लागेल. अन्यथा तुम्ही एक राजकारणी म्हणूनच ओळखले जाल. आमच्या ईमानावर हल्ला करणारा हा कायदा आहे. आमच्या धार्मिक स्थळांच्या जमिनी घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा काळा कायदा आहे आम्ही याला फाडतो. मोदींनी हा कायदा बनवला त्यासाठी. मुंबईचा सर्वात मोठ्या व्यक्तीचे या जागेवर घर बांधले आहे. त्याचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे त्यामुळे आपल्या मित्रांसाठी हा कायदा आणला आहे असे खासदार ओवैसी म्हणाले.

हेही वाचा:

पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget