एक्स्प्लोर

Anant Geete on Raigad Lok Sabha : मला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिलीय, रायगडमधून मी लढणार : अनंत गीते

Anant Geete on Raigad Lok Sabha : अनंत गीते म्हणाले, "रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे".

नवी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok Sabha) माझी उमेदवारी जाहीर केली आहे, असा दावा अनंत गीते यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.  

अनंत गीते म्हणाले, "रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे". खोपोली येथील रमाधाम वृ्द्धाश्रमासाठी ही बैठक आहे. बैठकीला पक्षाचे नेते , उपनेते, आमदार , मुंबई विभागप्रमुख, रायगडचे जिल्हाप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर विषयांवर चर्चा होईल.  कोकण पदवीधर मतदार संघाचा उमेदवार उद्धा उद्धव ठाकरे जाहीर करतील, असंही अनंत गीते यांनी सांगितलं.

मावळमध्ये श्रीरंग बारणेंचा पराभव करणार (Thackeray group will defeat Shrirang Barne)

दरम्यान, यावेळी अनंत गीते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबतही भाष्य केलं. "मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल", असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.  

रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha Election result 2019)

रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे तत्कालिन खासदार अनंत गीते यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या दोन्ही बाजूकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे 2019 मध्येही लोकसभेची कोकणातील रंगतदार लढत म्हणून रायगड लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं गेलं. 2014 मध्येही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली होती. त्यावेळी अनंत गीते यांनी विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र 2019 मध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारुन पराभवाचा वचपा काढला होता.  

आता येत्या निवडणुकीत रायगड लोकसभेत कोणत्या गटाकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

VIDEO : अनंत गीते नेमकं काय म्हणाले? (Anant Geete on Raigad Lok Sabha)

 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget