Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरुन कौतुक, ठाकरे-पवारांवर निशाणा, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Amruta Fadnavis, नागपूर : "लाडकी बहीण योजना एकदम हिट झालेली योजना आहे. मी बऱ्याच दिवसांनी ईथे आले माञ तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही फार आनंदी दिसतं आहात. अनेक योजना तुम्हाला मिळत आहेत, माहिती नसेल तर माहिती करून फायदा करून घ्या. नागपुरात मोठा विकास झाल्याने आज नागपुरात अनेकांची येण्याची इच्छा आबे, देशात मोदीला निवडूण आणलं तसच महाराष्ट्रात भाजपला निवडूण आणणे गरजेचे आहे", असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री फडणीसांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
मोठा नेता माझ कुटुंब माझी जबाबदारी म्हणू शकत नाही, त्यामुळे मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे आणि ते जनतेची कामे करतात, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तुम्हाला आता कंबर कसून बाहेर पडायचं आहे.नोव्हेंबरमध्ये आपल्याला आपल्या भागात सर्वाधिक मतदान झाले पाहिजे. आपल्या मुलीला पॉवर मध्ये किंवा मुख्यमंत्री बनवायचं असे आपल्यात कोणी नेते नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.
देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नरेंद्र मोदींनी केंद्रात काम केलं
अमृता फडणवीस म्हणाल्या, लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यांचं प्रेम मिळत आहे. याचा आनंद आहे. लाडकी बहीण असो किंवा योजना असो देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नरेंद्र मोदींनी केंद्रात काम केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालावर हल्ला झाला यावर बोलताना म्हणाल्या, अशा गोष्टी चालत राहतात. आपण मानसिक प्रॉबलेम असलेल्या लोकांवर उपचार केले पाहिजेत, त्यांच्याकडे करुणेला पाहिले पाहिजे.
विरोधक लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ बनत आहेत
महायुती आणि भाजपा सत्तेत येईल. विरोधकांचे काम टीका करणे हेच आहे. त्यामध्ये काही नवीन नाही किंवा नवल नाही. विरोधक लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ बनत आहेत. त्यांनी बनायला नको. बहिणींचं चांगलं होतं आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांना गरज आहे. कोर्ट केसेस करुन नयेत, अडथळा आणू नये, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं. मी खूप फिरत आहे, स्त्रीयांचा खूप प्रतिसाद आहे. मी देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की, जे महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं आहे ते व्हाव. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं. देवेंद्रजी लोकांच्या संपर्कात सदैव असतात. आता सुद्धा त्यांचे दौरे वाढले आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Chhagan Bhujbal : महात्मा फुले ब्राह्मणांचे नाही तर ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते, ब्राह्मणांच्या वाड्यात त्यांनी पहिली शाळा काढली : छगन भुजबळ