एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?

Maharashtra Assembly Elections 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लहू कानडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा झाली. मात्र सभेआधीच अजित पवार यांनी श्रीरामपूरमध्ये मोठा डाव टाकला. 

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ (Shrirampur Assembly Constituency) राज्यभरात चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Group) लहू कानडे (Lahu Kanade) तर शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Group) भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा अचानक रद्द करण्यात आली. यानंतर भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे लहू कानडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये दाखल झाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेआधीच त्यांनी श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी खेळली आहे. 
 
अजित पवार श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या घरी दाखल झाले. सभेला जाण्याअगोदर अजितदादांनी घेतली भानुदास मुरकुटे यांच्या कुटुंबीयांची श्रीरामपूरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  माजी आमदार भानुदास मुरकुटे एका प्रकरणात महिनाभरापासून जेलमध्ये आहेत. आज अजित पवार यांनी भानुदास मुरकुटे यांचा मुलगा सिद्धार्थ मुरकुटे याची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे अजित पवारांच्या भेटीनंतर मुरकुटे हे कानडे यांना पाठिंबा देणार का? असा चर्चांना आता उधाण आले आहे. मात्र अजित पवार यांची भेट कौटुंबिक होती. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थ मुरकुटे यांनी दिली आहे. 

लहू कानडेंचा बाळासाहेब थोरातांना टोला

दरम्यान, श्रीरामपूर येथील सभेत लहू कानडे म्हणाले की, मंडप लहान पडला. त्यामुळे अनेकांना उन्हात उभ राहावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. 2019 ला काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्यांनी आपल्याला गळ घातली आणि उमेदवारी केली. मी आमदार झाल्यावर अजयदादांनी मला तुम्ही माझ्या जवळचे आमदार आहात, असे आवर्जून सांगितले होते. मी काँग्रेसचा प्रामाणिक असताना आणि मान उंचावेल असे काम केलेले असताना काँग्रेसने विश्वासघात केला. मात्र, काही मंडळींनी वरिष्ठांचे कान भरले आणि माझी उमेदवारी डावलली. महायुतीतील सर्व नेत्यांशी विचार विनिमय करून मला महायुतीची उमेदवारी अजितदादांनी दिली. माझी घर का ना घाट का अशी अवस्था काँग्रेसने केली होती. ज्या लोकांनी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बुद्धीची किव येते. माझ्यासोबत असणारे काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे, असे म्हणत त्यांनी बाळासाहेब थोरात यांना न घेता टोला लगावला. काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर हिरवळीतले साप डसल्याशिवाय राहिले नसते, असेही लहू कानडे यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget