एक्स्प्लोर

Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा : संजय सिंह

Maharashtra Assembly Election 2024: आपच्या बड्या नेत्याकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्याची मागणी

मुंबई: हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (AAP) नेते संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय सिंह यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले. मविआने (MVA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले. 

माझं वैयक्तिक मत आहे, जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार  महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये हेच झालं की काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले, त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे माझं म्हणणं आहे  नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम  केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझं वैयक्तिक मत आहे, असे संजय सिंह यांनी म्हटले. भाजपाला आम्ही हरवायचं ठरवलं आहे. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा देत होते पण तरी आम्ही घेतली नाही, असेही संजय सिंह यांनी सांगितले.

राज ठाकरे यांची महायुतीसोबतच भांडण चालू आहेत. त्यांच्या मुलाला जागा हवी होती तिथे सुद्धा ती जागा त्यांना दिली नाही. मला वाटत नाही राज ठाकरे भाजपचा समर्थन करायला जात आहेत,ते वेगवेगळा स्टॅन्ड घेतात. थोडी काही मतं मनसे फोडू शकते, शिंदे गट फोडू शकतो. पण जर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना चेहरा केलं तर ही मतांची फोडाफोडी सुद्धा कमी होऊ शकते, असे संजय सिंह यांनी म्हटले. 

भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला: संजय सिंह

महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीच राजकारण झालं ते सगळ्यांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रातसोबत  सावत्र आईसारखा  व्यवहार केला. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान आपल्या  गृहराज्यात घेऊन गेले. एका राज्याचे नुकसान करून हे करणे योग्य नाही. आतापर्यंत आपण बाईकचोर  व इतर चोर पाहिले, पण भाजपने तर पक्ष चोरला, जिथे पक्ष चोरला जिथे इक्बाल मिरची सोबत संबंध असलेल्यांना सोबत घेतलं, अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना सोबत घेतलं हे सगळं लोकांना माहिती आहे, अशी टीका संजय सिंह यांनी केली.
 
'एक है तो सेफ है' घोषणेवरुन संजय सिंहांनी भाजपला फटकारले

दहा वर्षानंतर तुम्ही म्हणता एक हे तो सेफ आहे. तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात. पंतप्रधानांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या. पंतप्रधान जर सुरक्षित ठेवू शकत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा.  बटेंगे तो कटेंगे हा काय नारा आहे? अगर बटेंगे संविधान खतरे मे आ जायेगा,  आरक्षण खतम हो जाएगा... ना बटिये ना कटीये मिलके बीजेपी को रपटिये, अशी टिप्पणी संजय सिंह यांनी केली.

आणखी वाचा

महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत किती जागा मिळणार?; एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितला आकडा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget