एक्स्प्लोर

Amol Kolhe : उदयनराजे राज्यसभेवर, शशिकांत शिंदे लोकसभेवर, सातारकरांना दोन खासदार निवडून देण्याची मोठी संधी : अमोल कोल्हे

Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. साताऱ्यावर शरद पवार तसेच देवेंद्र फडणवीसांची विशेष नजर आहे. 

सातारा : लोकसभेच्या निमित्ताने इतरांना एक खासदार निवडण्याची संधी असताना सातारकरांना मात्र एकाचवेळी दोन खासदार निवडण्याची संधी असल्याचं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. भाजपच्या उदयनराजेंची (Udayanraje Bhosale)  राज्यसभेची अजून अडीच वर्षे बाकी आहेत, त्यामुळे शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) निवडून दिल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील असं मत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केलं. 

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वाई विधानसभा मतदारसंघातील पाचवड या ठिकाणी सभा घेण्यात आली. त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर खिल्ली उडवली. कॉलर कधी टाईट झाली पाहिजेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावर उदाहरण देत असताना त्यांनी सातारकरांना दोन खासदार देण्याची एक वेगळी संधी आल्याचं सांगितलं.

एक खासदार जे छत्रपतींचे वारसदार आहेत, त्यांचे अडीच वर्ष बाकी आहेत. दुसरे शशिकांत शिंदे हे लोकसभेत जनतेतून निवडून जातील असं मत अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केलं.

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा शरद पवारांच्या प्रतिष्ठेची जागा असल्याने पवारांनी या ठिकाणी अनेक सभा घेतल्या आहेत. त्याचेवळी भाजपनेही यावेळी सातारा मतदारसंघ हा कोणत्याही परिस्थितीतून राष्ट्रवादीकडून काढून घ्यायचा असा चंग बांधल्याचं दिसतंय. 

राज्यात तिसऱ्या टप्प्यात पवारांची प्रतिष्ठा पणाला

राज्यात तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. जिथं आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 , भारतीय जनता पक्षाचे 4 आणि शिवसेनेचे 4 खासदार होते. मात्र याच भागात शरद पवार आणि अजित पवारांचा, एका अर्थानं राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे. कारण 2019 साली झालेल्या लोकसभेचा निकाल पाहिला तर राष्ट्रवादीच्या चार पैकी तीन खासदार याच टप्प्यातील मतदारसंघातून आलेत. त्यामुळे आता होणारा तिसरा टप्पा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. 

मात्र सध्याची राजकीय पूर्णपणे स्थिती बदललीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय. शरद पवार आणि अजित पवारांनी वाटा वेगळ्या केल्यात. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसत असला तरी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 जागांवर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

सातारा आणि माढ्यावर फडणवीसांची विशेष नजर 

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष नजर आहे. फलटणमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचाराची सांगता सभा घेणार आहेत. रविवारी सकाळी लातूर तर दुपारी फलटणमध्ये फडणवीस यांची सभा होणार आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Embed widget