Lok Sabha Elections Results 2024 Live : PM मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा, एनडीएच्या बैठकीनंतर घेणार राष्ट्रपतींची भेट; राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Lok Sabha Elections Results 2024 Live : मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची बाजी? देशात सत्ता कोणाची, मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर.

Background
Lok Sabha Elections Results 2024 Live : अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल लागणार आहे. त्याआधी देशात एकूण सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाची ही प्रक्रिया 1 जून रोजी संपली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक पार पाडली. गुजरातमधील सूरत येथील निवडणूक बिनविरोध झाली. या जागेवरून भाजप उमेदवार विजयी झाला. आता 542 जागांवरील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पाडली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची निवडणूक ठरवणार आहे..या निवडणूकीचे निकाल स्पष्ट करतील कुणासोबत सहानुभूती आहे तर कुणासोबत जनमत. कोण गाठणार मॅजिक फिगर तर कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार. राम मंदिर, आर्टिकल ३७०, ट्रिपल तलाक, आरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कोणता मुद्दा गेमचेंजर ठरणार..? निकालाआधी जनतेचा कल समजल्या जाणाऱ्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपच्या पारड्यात मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
2024 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळतील ? कुणाचं सरकार स्थापन होईल ?
| एक्झिट पोल एजन्सी | एनडीए | यूपीए | अन्य |
| 1. News18 Mega Exit Poll | 355-370 | 125-140 | 42-52 |
| 2.Jan Ki Baat | 363-392 | 141-161 | 10-20 |
| 3. CNX. | 371-401 | 109-139 | 28-38 |
| 4. ABP News-CVoter | 231-275 | 122-161 | 02-10 |
| 5. Republic-Matrize | 353-368 | 118-133 | 43-48 |
| 6. INDIA TODAY - AXIS MY INDIA | 161-180 | 79-100 | 3-11 |
| 7. DAINIK BHASKAR | 281-350 | 145-201 | 33-49 |
| 8. INDIA TV | 371-401 | 109-139 | 28-38 |
| 9. TV9 पोलस्ट्राट | 216 | 134 | 21 |
| 10. Republic TV PMARQ | 359 | 154 | 30 |
| 11. News Nattion | 342-378 | 153-159 | 21-23 |
PM Modi NDA : नवी दिल्लीत एनडीए आघाडीची बैठक सुरू, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित
PM Modi NDA : नवी दिल्लीत एनडीए आघाडीची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित आहेत.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल, पंतप्रधानपदाचा देणार राजीनामा
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात.




















