लोकसभेत तुम्ही आम्हाला मदत केली, आता आमच्याकडून लढा; अजितदादांच्या आमदाराला अमित देशमुखांचे बोलावणे
Amit Deshmukh : अजित पवारांच्या आमदाराला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी साद घातली आहे.
Amit Deshmukh on Babasaheb Patil, नांदेड : अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभेत केलेली मदत कामाला आली. जाहीर आभार मानता येत नाहीत, मात्र जिल्हा बँकेच्या जीबीमध्ये आभार मानतो, असे म्हणत माजी मंत्री अमित देशमुख यांनी बाबासाहेब पाटील यांची वाट बिकट केली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत प्रचाराला ते बाहेर पडले नव्हते
अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील अजित पवार गटाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचाराला ते बाहेर पडले नव्हते असा त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. याच कारणामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील आणि प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी बाबासाहेब पाटील यांचे विरोधात मोर्चे बांधणी केली होती. जाहीर वक्तव्य करत बाबासाहेब पाटील यांना एकही भाजपाचे मत पडू देणार नसल्याचा निर्धार केला होता. यामध्ये अजित पवार रावसाहेब दानवे यांना मध्यस्थी करावी लागली होती. दोन दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. आता कुठे ते शांत होताना दिसत असतानाच अमित देशमुख यांनी असं वक्तव्य करून अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील येऊ घातलेल्या निवडणुकीत अडचणीत निर्माण केल्या आहेत.
काय म्हणाले अमित देशमुख ?
आम्ही एक होतो, बाबासाहेब पाटील तुम्ही आम्हाला सोडून गेलात ,तुम्ही किती अडचण केली आमची , महाराष्ट्रामध्ये बदल होतो आहे. लोकसभेत बदल घडवला. राज्यात होणाऱ्या बदलाचे खासदार डॉ शिवाजी काळगे हे पाहिले प्रतिक आहेत, आणि बाबासाहेब पाटील , कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीत तुमची जी मदत आम्हाला झाली. त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यावर तरी आभार मानले पाहिजेत, एव्हढ तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी घालून दिलेल्या संस्कृतीचे पालन करतो,असं अमित देशमुख यांनी म्हटले आहे. टिव्हीवर अजूनही अधून मधून बातम्या येतात,काही तरी घडेल , ऐकता की नाही. तस काही घडलेच तर जे वातावरण जिल्हा बँकेत आहे ते वातावरण आपणाला जिल्ह्यात करता येईल. अहमदपूरच्या जागेसाठी काँगेसने लढले पाहिजे, काँगेसने लढले पाहिजे असा आग्रह असतो, बाबासाहेब पाटील तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि मागणीही पूर्ण होईल, असं अमित देशमुख म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले