सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले
सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलावलं असेल तर ही चूक आहेच. दुसऱ्या बाजूला मात्र जर पंतप्रधान आपणहून त्यांच्याकडे गेले असतील सरन्यायाधीश यांनी अशी भेट चुकीची आहे हे सांगायला पाहिजे, असे उल्हास बापट म्हणाले.
![सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले PM Modi Visits CJI Dhananjay Chandrachud Ulhas Bapat Says its Wrong Maharashtra Marathi News सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर चूकच, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/12/271c99d2fc8e9428142fbba93244f6f7172615052917989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) दर्शन घेतल्यानंतर वादाला तोंड फुटलंय. देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ही चूकच, असे प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.
उल्हास बापट म्हणाले, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनेचे पद आहेत. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जातेय. घटनेत सगळ्याच गोष्टी लिहलेल्या नसतात, घटना उत्क्रांत होत गेलेली असते. प्रसिद्धीपासून न्यायाधीशांनी दूर राहावं असं म्हणलं आहे पण याकडे दुर्लक्ष झालं आहे.
लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर : उल्हास बापट
सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलावलं असेल तर ही चूक आहेच. दुसऱ्या बाजूला मात्र जर पंतप्रधान आपणहून त्यांच्याकडे गेले असतील सरन्यायाधीश यांनी अशी भेट चुकीची आहे हे सांगायला पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते आणि असं काही होत असेल तर ही चूक झाली आहे असंही बापट म्हणाले.
सरन्यायाधीशांच्या घरी दर्शन घेतल्याने वादाचा घंटानाद
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपुजेत सहभाग घेतला होता. बुधवारी पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सरन्यायाधीशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी अतिशय भक्तीमय वातावरण दिसून आले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतल्यानंतर वादाचा घंटानाद सुरू झालाय पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं हे प्रोटोकॉलला धरून आहे का, असा सवाल विरोधकांनी केलाय. शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी कोर्टाची मदत घेतली जातेय का, या लोकांच्या मनातल्या शंका यामुळे पक्क्या झाल्याचा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर या गोष्टीवरून राजकारण करणं हे नासक्या विचारांचं लक्षण असल्याचं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय. तर संजय राऊतांनी हा गणपतीचा अपमान केलाय असं प्रत्युत्तर सोमय्यांनी दिलंय.
हे ही वाचा :
नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; संजय राऊत म्हणाले, 'लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)